Prajakta Gaikwad : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने (Prajakta Gaikwad) येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात जेजुरीत 42 किलोंची खंडा तलवार उचलली आहे. तलवार उचलतानाचा व्हिडीओ आणि फोटो तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सदानंदाचा येळकोट म्हणत तिने भंडारा उधळतानाचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे.





प्राजक्ताने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. त्यानंतर प्राजक्ताला 'आई माझी काळूबाई' या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. मालिकेतून काढून टाकण्यात आल्याने प्राजक्ता चर्चेत होती. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते.





प्राजक्ताच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत आहेत. चाहत्यांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे. "मराठमोळी वाघिण, जिजाबाईंची लेक, नारी शक्ती जिंदाबाद". प्राजक्ताने 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेसोबत 'नांदा सौख्यभरे', 'संत तुकाराम' या मालिकेतदेखील काम केले आहे. 


संबंधित बातम्या


Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा' शोमध्ये RRR चित्रपटाचा धमाका; जाणून घ्या आरआरआरचा अर्थ


83 Box Office Collection : '83' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केली कोटींची कमाई, चार दिवसांत कमावले 54.29 कोटी


January 2022 Films Calender : नवीन वर्षाची सुरुवात फिल्मी, वर्षाच्या सुरुवातीला 'हे' सिनेमे होणार प्रदर्शित


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha