Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत दिल्लीच्या 7 जागांवर मतदान होत आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री एस. जयशंकर (S Jaishankar) यांच्यासोबत एक विचित्र घटना घडली. मतदानासाठी ते केंद्रावर पोहोचले असता तेथे त्यांचे नाव आढळून आले नाही. त्यानंतर दुसऱ्या केंद्रावर जाऊन मतदान केले. संपूर्ण प्रकरण जाणून घ्या.


दिल्लीतील मतदान केंद्रावर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पोहोचले आणि मतदानाच्या रांगेत (S Jaishankar Voting News) जवळपास 20 मिनिटे उभेही राहिले, पण त्यांना त्या ठिकाणी मतदानच करता आलं नाही. मतदान न करताच त्यांना घरी जावं लागलं आणि घरी जाऊन तपास केला असता त्यांचे मतदान केंद्र वेगळं असल्याचं समोर आलं. नंतर त्यांनी दुसऱ्या मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला. 


जयशंकर दुसऱ्याच मतदान केंद्रावर पोहोचले


लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत दिल्लीच्या 7 जागांवर मतदान होत आहे. पण काहींचे मतदान यादीत नावच नाही, काहीचे दुसऱ्याच ठिकाणी मतदानात नाव असणे असं अनेक ठिकाणी घडल्याचं दिसून आलं. केंद्रीय मंत्री एस. जयशंकर हेदेखील यातून सुटले नाहीत. 


दिल्लीतील तुघलक लेनमधील अटल आदर्श शाळेत जयशंकर हे  सकाळी मतदानासाठी गेले होते. यावेळी ते मतदानासाठी सुमारे 20 मिनिटे रांगेतही राहिले. मात्र त्यांचे नाव मतदार यादीत नसल्याचं समोर आलं. नंतर त्यांनी घरी येऊन पुन्हा तपासणी केली. त्यानंतर अन्य कोणत्यातरी केंद्रावर त्यांचे नाव आढळून आल्याने त्यांनी तेथे पोहोचून मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहनही जयशंकर यांनी केलं.


 






त्या मतदान केंद्रावर मतदान करणारे जयशंकर हे पहिलेच पुरूष


नवी दिल्लीतील लोकसभा मतदारसंघ-04 मतदान केंद्र क्रमांक-53 येथे एस जयशंकर यांनी मतदान केलं. त्या मतदानकेंद्रावर मतदान करणारे ते पहिलेच पुरुष ठरले. तशा प्रकारचे प्रमाणपत्रही नवी दिल्लीच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने त्यांना देण्यात आलं. स्वत: केंद्रीय मंत्र्यांनी प्रमाणपत्रासह त्यांचे छायाचित्र सोशल मीडिया साइट X वर पोस्ट केले आहे.


ही बातमी वाचा: