Madan Das Devi Passed away : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रभारी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी संघटन मंत्री मदन दास देवी यांचे आज पहाटे बेंगळुरू येथे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मदन दास देवी हे गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते घरीच थांबले होते. त्यामुळे वर्षभरापूर्वी त्यांच्यावर हरिद्वारच्या पालमपूरच्या आयुर्वेद संस्थेत पंचकर्म आणि इतर उपचारही करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर उद्या 25 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

  


मदनदास देवींनी बालपणापासूनच आपले आयुष्य राष्ट्रसेवा आणि संघकार्यात घालवले. आयुष्यातील जवळपास 70 वर्ष त्यांनी संघाच्या प्रचारासाठी काम केले. संघापासून ते भाजपपर्यंत राजकीय निरीक्षक म्हणूनही ते कार्यरत होते.


विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री म्हणून काम करताना त्यांनी अनेक नेते घडवलेत. अरूण जेटली, अनंत कुमार, सुशिल मोदी, शिवराज सिंग चव्हाण, धर्मेंद्र प्रधान, विनोद तावडे अशा अनेक भाजपाच्या नेत्यांनी त्यांच्याकडून समाजकार्य संघटनेचे शिक्षण घेतले. 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील वाहिली श्रद्धांजली 






राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आदरणीय मदनदास देवी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दु:ख झाले आहे. विद्यार्थी जीवनापासून मला मदनदासजींसोबत काम करण्याची आणि त्यांच्याकडून संघटन कौशल्ये शिकण्याची संधी मिळाली. चार्टर्ड अकाऊंटंटमध्ये सुवर्णपदक मिळाल्यानंतरही त्यांनी संघाचे प्रचारक म्हणून स्वत:ला देश आणि समाजासाठी समर्पित करत आपले काम सुरू केले. स्टुडंट कौन्सिलच्या माध्यमातून त्यांनी देशातील कोट्यवधी युवकांना प्रेरणा दिली. त्यांच्या निधनाने देशाने एक दिग्गज गमावला आहे. मदनदासजींचे कार्य, त्यांची मूल्ये माझ्यासारख्या कोट्यवधी कार्यकर्त्यांना सदैव प्रेरणा देत राहतील. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो. ॐ शांती. अशा प्रकारे ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Weather Update : दिल्लीत यमुनेच्या पातळीत वाढ, तर उत्तर प्रदेश-राजस्थानमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज