बंगळुरु : कर्नाटकमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. हवाला एजंटच्या घरातून 5 कोटी 70 लाखांच्या नव्या नोटा जप्त केल्या आहेत. शिवाय, 90 लाखांच्या जुन्या नोटाही जप्त केल्या असून, 32 किलो सोनं-चांदीही सापडलं आहे. घरातील बाथरुममध्ये सर्व नोटा लपवल्याचेही समोर आले आहे.

बाथरुमच्या टाईल्सच्या मागे तिजोरी तयार करुन रोकड लपवण्यात आली होती. हवाला एजंटच्या घरावरील छाप्यात कोट्यवधींच्या रोकडीसोबतच सोनं आणि चांदीही जप्त करण्यात आली आहे. 32 किलो सोनं आणि चांदी सापडलं आहे.


गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांमधील आयकर विभागांच्या टीमने संयुक्त कारवाई केली. हवाला एजंटकडे इतकी मोठी रोकड सापडल्यानंतर ही संयुक्त कारवाई अजूनही सुरु ठेवण्यात आली आहे.