चेन्नई: तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाच्या धक्क्यानं एकूण 280 लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतांचा नातेवाईकांना प्रत्येकी 3 लाखांची मदत एआयडीएमके करणार आहे. तर जयललिताच्या निधनानं ज्या लोकांनी आपल्या शरीराला इजा करुन घेतली आहे अशा लोकांना 50 हजारांची मदत करण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानं तामिळी जनतेला शोक अनावर झाला. अम्मांच्या मृत्यूचा आघात सहन न झाल्यानं तब्बल 280 जणांनी आपले प्राण गमावल्याची माहित एआयएडीएमके पक्षाने दिली आहे.

गेल्या महिन्यापासून जयललिता फुफ्फुसाच्या विकारामुळं अपोलो रुग्णालयात उपचार घेत होत्या. मात्र, सोमवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर तामिळनाडू राज्य शोकात बुडालं.