ISRO New Chief S Somnath: भारताची अंतराळ संस्था ‘भारतीय अंतराळ आणि संशोधन संघटना’ (ISRO) चे पुढील प्रमुख म्हणून रॉकेट शास्त्रज्ञ एस सोमनाथ (S. Somanath) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एस सोमनाथ यांनी GSLV Mk-III लॉन्चर च्या विकासात महत्वाची भूमिका निभावली आहे. आता एस सोमनाथ ISRO मधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख असेलेल्या सिवन (Kailasavadivoo Siva)यांची जागा घेतील. के सिवन यांचा कार्यकाळ शुक्रवारी संपत आहे.  


ISRO चे नवनियुक्त अध्यक्ष एस सोमनाथ यांनी बुधवारी म्हटलं की, भारतीय अंतराळ क्षेत्रात खाजगी कंपन्यांना व्यापाराच्या संधी विकसित करणं गरजेचं आहे. भावी पीढीच्या गरजा लक्षात घेऊन भारतीय अंतराळ कार्यक्रमात बदल करणं देखील गरजेचं आहे.  


 इसरोचं खाजगीकरण होणार नाही 
 
ISRO चे नवनियुक्त अध्यक्ष एस सोमनाथ यांनी म्हटलं की, भारतीय अंतराळ कार्यक्रम ISRO पर्यंतच मर्यादित आहे. मात्र आता सरकारची इच्छा आहे की, या क्षेत्रात नवीन लोकं यावीत. सोमनाथ यांनी अंतराळ बजेट वाढवण्याची गरज देखील बोलून दाखवली.


त्यांनी सांगितलं की, सध्याचं अंतराळ बजेट  15,000-16,000 कोटी आहे. जे वाढवून  20,000-50,000 कोटींहून अधिक करण्याची गरज आहे.  सोमनाथ यांनी म्हटलं आहे की, अंतराळात प्रगती ही केवळ सरकारी निधि किंवा पाठिंब्यानंच होणरा नाही. दूरसंचार आणि हवाई यात्रा अशा क्षेत्रात जे बदल झाले ते या क्षेत्रातही होणं गरजेचं आहे.  यामुळं अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होती आणि संशोधनाच्या क्षेत्राची व्याप्ती अधिक होईल. असं असलं तरी इसरोचं खाजगीकरण मात्र होणार नाही, असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha






इतर महत्वाच्या बातम्या