मुंबई :  उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक, अजातशत्रू राजकारणी आणि सहृदय व्यक्ती अशा अनेक उपमा ज्यांना कमी पडतील अशा माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं दु:खद निधन झालं. रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान वयाच्या 67 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मध्यरात्री त्यांचं पार्थिव दिल्लीतील निवासस्थानी आणण्यात आलं. बुधवारी सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 12 ते 3 पर्यंत भाजपच्या केंद्रीय कार्यालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल. त्यानंतर दुपारी 3 वाजता लोदी रोडच्या विद्यूत दाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.


दरम्यान सुषमा स्वराज यांच्या  निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अमिताभ बच्चन

एक अत्यंत दुःखद बातमी. एक ताकतवर राजकीय नेता, एक मिळून मिसळून राहणारं व्यक्तिमत्व, एक अद्भुत प्रवक्ता. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो, असे अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.


लता मंगेशकर

ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सुषमाजींच्या निधनाचं वृत्त धक्कादायक आहे. त्या खूप संवेदनशील होत्या.  संगीत आणि कवितेवर प्रेम करणारी एक चांगली मैत्रीण गमावली आहे.


 जावेद अख्तर
गीतकार जावेद अख्तर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, सुषमाजींच्या निधनाने खूप दु:खी आहे. संगीत क्षेत्राच्या उन्नतीसाठी आणि रक्षणासाठी लोकसभेत त्यांनी केलेल्या कामासाठी हे क्षेत्र नेहमी त्यांचे  ऋणी राहील. तुम्ही खूप चांगल्या व्यक्ती होता. आम्ही आपले नेहमी आभारी राहू.


शबाना आझमी
शबाना आझमी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की सुषमाजींच्या निधनाने खूप दु:खी आहे. वेगळी विचारधारा असूनही आमच्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. त्या गतिमान आणि सुलभ व्यक्तित्वाच्या धनी होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.


सनी देओल
अभिनेता आणि भाजप खासदार सनी देओलने म्हटले आहे की, सुषमाजी आपल्या देशातील चांगल्या नेत्यांपैकी एक होत्या. त्या नेहमी लक्षात राहतील. त्यांचा परिवार आणि नातेवाईकांसाठी मी प्रार्थना करतो.


रितेश देशमुख
रितेश देशमुख ने ट्वीट करत म्हटलं आहे की, तुम्ही नेहमी चमकत राहाल. आम्ही तुम्हाला नेहमी लक्षात ठेवू, महिला शक्ती... ईश्वर तुमच्या आत्म्याला शांती देवो.


स्वरा भास्कर
स्वरा भास्करने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, सुषमाजी लोकशाहीच्या मानकांप्रती प्रतिबद्ध नेत्या होत्या. एक चांगल्या खासदार, एक चांगला द्विभाषी संचालक, एक मानवीय परराष्ट्र  मंत्री म्हणून त्या प्रेरणादायी होत्या. माझा त्यांच्या विचारधारेशी मतभेद होते. मात्र त्यांचे संकल्प आणि कामाच्या पद्धतीची मी खूप मोठी चाहती आहे.


बोमन ईरानी
बोमन ईरानीने म्हटलं आहे की, खूप कमी वयात त्यांचं निधन झालं. ही बातमी ऐकल्यावर दुःख झालं. देशाची मोठी हानी झाली आहे.

मधुर भंडारकर
‏मधुर भंडारकर ने ट्वीट करत म्हटलं आहे की, सुषमाजींच्या अकाली निधनाने हैराण आहे. त्या खूप शालीन व्यक्ती आणि शानदार खासदार होत्या. परराष्ट्र मंत्री म्हणून त्यांनी खूप भारी काम केलं आहे.

अदनान सामी 

गायक अदनान सामीने अत्यंत भावपूर्ण ट्वीट करत आदरांजली वाहिली आहे. मी आणि माझा परिवार ही बातमी ऐकून सुन्न झालो आहोत. सुषमाजी मला आईसमान होत्या. देशाच्या एक सन्मानित नेत्या. आम्ही त्यांना नेहमी आठवणीत ठेवू.


व्हिडीओ पाहा



संबंधित बातम्या

हृदयविकाराच्या झटक्याने सुषमा स्वराज यांचं निधन  

सुप्रीम कोर्टातील वकील ते पहिल्या पूर्णवेळ महिला परराष्ट्रमंत्री; सुषमा स्वराज यांची धडाकेबाज कारकीर्द 

Sushma Swaraj : कलम 370 बद्दलचं सुषमा स्वराज यांचं 'ते' ट्वीट शेवटचं ठरलं