नवी दिल्ली : भारतीय लष्करानं मागील वर्षी 28-29 सप्टेंबरला सीमेपार जाऊन पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करुन सर्जिकल स्ट्राईक केलं होतं. यात जवळजवळ 50हून अधिक अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. पण सर्जिकल स्ट्राईक करणं आणि पुन्हा सुरक्षित माघारी परतणं हे लष्कराच्या जवानांसाठी वाटतं तेवढं सोपं नव्हतं.

कारण सर्जिकल स्ट्राईक आटोपून जेव्हा भारतीय लष्कराचे जवान माघारी परतत होते त्यावेळी अचानक पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरु झाला. यात काही गोळ्या जवानांच्या अगदी कानाच्या बाजूनं गेल्या होत्या. पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी तेव्हा झाली नव्हती.

सर्जिकल स्ट्राईक टीमचं नेतृत्व करणाऱ्या मेजर माइक टँगो (बदलेलं नाव) यांनी ‘इंडियाज मोस्ट फीयरलेस : ट्रू स्टोरीज ऑफ मॉडर्न मिलिट्री हीरोज’ या पुस्तकात सर्जिकल स्ट्राईकच्या त्या रात्रीचा थरार मांडला आहे. हे पुस्तक शिव अरुर आणि राहुल सिंह यांनी लिहलं आहे. यामध्ये सर्जिकल स्ट्राईकबाबतच्या 14 गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.

‘उरी हल्ल्यात आपले जवान ज्या तुकडीनं गमावले होते. त्याच दोन तुकडीतील जवानांची सर्जिकल स्ट्राईकसाठी निवड करण्यात आली. कारण की, त्यांना सीमेपलिकडील भाग बऱ्यापैकी माहिती होता.’ असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.

‘या सर्जिकल स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सवर हल्ला करण्याचं ठरलं होतं. पण या लाँचिंग पॅडसला पाकिस्तानी लष्कराचंही संरक्षण होतं. दहशतवाद्यांवर हल्ला करुन भारतीय जवान माघारी येत असताना पाकिस्तानी लष्कराला याची कुणकूण लागली आणि त्यांनी थेट गोळीबार सुरु केला. या हल्ल्यानं भारतीय जवान अजिबात घाबरले नाही. पण एलओसीजवळील रस्ता चढणीचा होता. त्यामुळे ज्या दिशेनं गोळीबार सुरु होता त्या दिशेकडे जवानांची पाठ होती. त्यामुळे भारतीय जवान थेट त्यांच्या टार्गेटवर होते.’ असं मेजर टँगो यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

'ज्या मार्गानं आम्ही पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसलो होतो त्याच मार्गानं परत न जाण्याचं ठरलं होतं. त्याऐवजी आम्ही दुसरा मार्ग निवडला होता. पण हा मार्ग बराच दूरवरचा आणि थोडा गुंतागुंतीचाही होता. पण तुलनेनं बऱ्यापैकी सुरक्षित होता. म्हणून आम्ही त्याची निवड केली होती. पण पाकिस्तानी लष्करानं त्याच दिशेनं गोळीबार सुरु केला. अनेकदा माझ्या कानाच्या बाजूनं काही गोळ्या गेल्या.' असा थरारक अनुभव मेजर टँगो यांनी सांगितला आहे.

टीम लीडर म्हणून मेजर टँगो यांनीच जवानांची निवड केली होती. त्यामुळे 19 जवान सुखरुपपणे लष्कराच्या तळावर पोहचतील की नाही याची त्यांना भीती वाटत होती. आपण आपले जवान गमावू अशी भीती टँगो यांना वाटत होती.

पण सुदैवानं भारतीय जवान पुन्हा सुखरुपणे आपल्या तळावर परतल्यानं टँगो यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराकडून मदत मिळते ही गोष्ट आता जगजाहीर झाली आहे. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळीही ही गोष्ट समोर आली आहे. सुत्रांच्या मते, दहशतवाद्यांना अशी अजिबात अपेक्षा नव्हती की, भारतीय लष्कर थेट आत घुसून मारा करतील. त्यामुळेच ते या हल्ल्यानं अवाक् झाले.

संबंधित बातम्या :

सर्जिकल स्ट्राईक: भारतीय जवान नेमके कसे घुसले?


पाण्याचा थेंबही न पिता रात्रभर सर्जिकल ऑपरेशनवर मोदींचं वॉच


होय, आम्ही LOC पार करुन अतिरेक्यांचा खात्मा केला : इंडियन आर्मी

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

ही कारवाई उरी हल्ल्यातील जवानांना श्रद्धांजली, कुटुंबीयांची भावना

काश्मीर मांगो गे तो चीर देंगे, भाजप कार्यालयाबाहेर जल्लोष

शांततेला आमचा दुबळेपणा समजू नका, पाकिस्तानच्या उलट्याबोंबा

अभिनंदन मोदीजी… उद्धव ठाकरेंचा पंतप्रधानांना फोन

सर्जिकल स्ट्राईक: वेळ आणि ठिकाण आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं!