Presidential Election : विधानसभा निवडणुकीत भाजपला पाच पैकी चार राज्यात घवघवीत यश मिळाले आहे. या विजयामुळे यंदा होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप पक्ष मजबूत झाला आहे. उत्तर प्रदेशमधील मोठ्या विजयामुळे राष्ट्रपतीपदाच्या निवणुकीसाठी भाजपला चांगला फायदा होऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. 24 जुलै 2022 रोजी राष्ट्रपती रामनाथ रोविंद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. 

उत्तर प्रदेश निवडणुकीचा निकाल समाजवादी पक्षाच्या बाजूने लागला असता, तर भाजपला बिजू जनता दल , तेलंगणा राष्ट्र समिती  आणि वायएसआर काँग्रेस पार्टी या पक्षांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहावे लागले असते. परंतु, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा मोठ्या फरकाने विजय झाला आहे. 

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी लोकसभा, राज्यसभेचे निवडून आलेले सदस्य, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दिल्ली किंवा पुद्दुचेरी विधानसभांचे निवडून आलेले सदस्य मतदान करू शकतात.   

राज्यसभेचे 233 सदस्य, लोकसभेचे 543 सदस्य आणि विधानसभेचे 4,120 सदस्य असे एकूण 4,896 मतदार असतात. प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य 708 इतके निश्चित करण्यात आले आहे. तर राज्यात एका आमदाराच्या मताचे मूल्य 208 आहे. उत्तर प्रदेश विधानसभेतील एकूण मतांचे मूल्य 83,824, पंजाब 13,572, उत्तराखंड 4480, गोवा 800 आणि मणिपूरच्या मतांचे मूल्य 1080 एवढे आहे. 

1971 च्या जनगणनेच्या आधारे प्रत्येक मताचे मूल्य संबंधित राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निश्चित केले जाते. या अंतर्गत, 4,896 मतदार असलेल्या गटाचे मूल्य 10,98,903 आहे. विजयी उमेदवाराला निवडून आलेले घोषित करण्यासाठी किमान 50 टक्के अतिरिक्त मतदान होणे आवश्यक असते. त्यामुळे सध्या भाजपकडील मतांचे मुल्य जास्त असल्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदाची निवडणूक सोपी जाणार आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

महत्वाच्या बातम्या

उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपची घोषणा, मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्वास

India Presidential Election : उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर नितीश कुमार सोडणार भाजपची सात? लवकरच घेऊ शकतात निर्णय