The Kashmir Files : 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाचे जगभरातून कौतुक होत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. यात गुजरात, हरियाणा, कर्नाटक आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. दरम्यान मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी मध्यप्रदेशातील पोलिसांना आनंदाची बातमी दिली आहे.





मध्यप्रदेशात 'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा पाहण्यासाठी पोलिसांना रजा मिळणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना रजा देण्याच्या सूचना डीजीपी सुधीर सक्सेना यांना देण्यात आल्या आहेत. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.





'द काश्मीर फाइल्स' या सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचे सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. सिनेमादेखील सध्या चर्चेत आहे. 'द कश्मीर फाइल्स' सिनेमात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट आहे.


संबंधित बातम्या


The Kashmir Files : ‘द काश्मीर फाइल्स’ बनवण्याचा उद्देश काश्मिरी पंडितांबद्दल कणव नाही तर...; काँग्रेसचा गंभीर आरोप


IMDb Rating : आयएमडीबीने घटवले ‘द काश्मीर फाईल्स’चे रेटिंग! कारण देताना म्हणाले...


Pushpa : फ्लॉवर नाही 'पुष्पा 2' फायर बनणार! निर्मात्यांनी बदलली अल्लू अर्जुनच्या चित्रपटची स्क्रिप्ट


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha