Republic Day Parade 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) सोहळ्यावर दहशतवादी धोका लक्षात घेता, दिल्ली पोलिस संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहेत. विजय चौक ते लाल किल्ल्यापर्यंतच्या परेड मार्गाचे छावणीत रूपांतर करण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षेसाठी जवळपास 30 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तर, राष्ट्रपती राम नाथ कोविंद (President Ram Nath Kovind) आज संध्याकाळी देशाच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत.


दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी शौर्य पुरस्कार जाहीर केले जातात. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाच्या सुरक्षेसाठी अतुलनीय शौर्य दाखवून बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच यावर्षीही 2022 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जवानांना शौर्य पुरस्काराने सन्मानित केले जाईल. 




शौर्य पुरस्कारा व्यतिरिक्त, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक ओळखला जाणारा पद्मश्री पुरस्कारासह पद्म पुरस्कारांची घोषणा आज करण्याची शक्यता आहे. हे पुरस्कार भारत सरकारकडून दरवर्षी भारतीय नागरिकांना त्यांच्या असामान्य कार्यासाठी दिले जातात. 


दिल्ली पोलिसांची कडक सुरक्षा व्यवस्था  


26 जानेवारी  रोजी सकाळी 10:20 वाजता विजय चौकातून प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होईल. खबरदारी म्हणून मंगळवारी (25  जानेवारी) सायंकाळी 6 वाजल्यापासून राजपथावरील विजय चौक ते इंडिया गेटपर्यंतची  वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. याशिवाय रात्री 11 नंतर रफी मार्ग, जनपथ, मानसिंग मार्ग रोडवर कोणीही जाऊ शकणार नाही. 26 जानेवारी रोजी दुपारी 2 ते रात्री12:30 या वेळेत परेड मार्गावर जाण्यास वाहतूक पोलिसांनी मनाई केली आहे. केवळ प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी, दिल्ली पोलिस आणि इतर एजन्सीच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, सुमारे 30 हजारांहून अधिक सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तसेच, मदतीसाठी निमलष्करी दलाच्या 65 कंपन्याही तैनात करण्यात आल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha