केंद्र सरकारने लॉकडाऊन दरम्यान दिलेल्या नियमांचे उल्लंघन राज्यात झाल्याच्या तक्रारीचा आढावा हे पथक घेणार आहे. ह्यात अत्यावश्यक सेवा मिळत आहे की नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत आहे का? आरोग्याच्या योग्य सोयी-सुविधा आहेत का? आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांची परिस्थिती आणि राज्यात मजूर आणि गरिबांसाठी काय व्यवस्था केली याच आढावा हे केंद्रीय पथक घेणार आहे. महाराष्ट्रप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये इंदोर, राजस्थानमध्ये जयपूर तर पश्चिम बंगालमध्ये कोलकाता, दार्जिलिंग, जलपैगुडी, हावडा अशा शहरात हे केंद्रीय पथक जाणार आहे. विशेष म्हणजे या चार राज्यपैकी फक्त मध्य प्रदेश मध्येच भाजप शासित राज्य सरकार आहे.
पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईतील पथकात कोण असणार?
मनोज जोशी, (अतिरिक्त सचिव, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय), डॉ. एस. डी. खापर्डे, डॉ. नागेश कुमार सिंग, अभय कुमार, अनुराग राणा, अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पुण्यातील पथकात कोण असणार?
संजय मल्होत्रा, डॉ. पी. के. सेन, डॉ. पवन, कुमार सिंग, डॉ. अविनाश गवई, करमवीर सिंग, हे अधिकारी पुण्याच्या टीममध्ये असणार आहेत.
लॉकडाऊन वाढलं
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलला संपणार होती. मात्र, कोरोनावर नियंत्रण मिळवता न आल्याने पुन्हा दुसरा लॉकडाऊन घेण्यात आला आहे. यावेळी हा लॉकडाऊन 19 दिवसांचा असून याची मुदत 3 मे ला संपत आहे.
CM Uddhav Thackeray | पालघरमध्ये घडलेल्या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका : उद्धव ठाकरे