नवी दिल्ली : जीवघेणा कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. अशातच आजपासून म्हणजेच 20 एप्रिलपासून देशांतील काही भागांत लॉकडाऊन अंशतः शीथिल करण्यात येणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊनचे सर्व नियम लागू असणार आहे. फक्त ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादूर्भाव पाहायला मिळत नाही. फक्त त्याच ठिकाणी लॉकडाऊनचे नियम शीथिल करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून आजपासून हॉटस्पॉट नसणाऱ्या ठिकाणी लॉकडाऊनच्या गाइडलाइन्समधून सूट देण्यात येणार आहे. जाणून घ्या, आजपासून लॉकडाऊनमधून कोणत्या गोष्टींना सूट मिळणार आहे, त्याबाबत सविस्तर

फक्त आवश्यक सामानाची ऑनलाईन डिलीवरी

देशातील लॉकडाऊनपासून शेतकऱ्यांना सूट देण्यात आली आहे. शेतीशी निगडीत प्रत्येक कामात सूट देण्यात आली आहे. तसेच फक्त आवश्यक सामानांचीच होम डिलीवरी करण्यास परवानगी दिली आहे. याआधी फक्त अत्यावश्यक सेवांनाच लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली होती. परंतु, आता लघुउद्योग, लहान व्यावसायांशी जोडलेल्या व्यक्ती, छोटी दुकानं यांनाही लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ : दिल्लीत जेवण मिळत असल्याच्या अफवेनंतर सरकारी शाळेच्या गेटवर तुफान गर्दी

कोणाला लॉकडाऊनमधून सूट मिळणार?

  • किराणा दुकान
  • भाजी, फळांची दुकानं, स्टॉल
  • मांस, मासे मिळणारी दुकानं
  • महामार्गावरील ढाबे
  • कुरिअर सेवा
  • ई-कॉमर्स
  • मॅकॅनिक
  • आयटी कंपनी
  • सरकारी कार्यालयं
  • प्लंबर
  • इलेक्ट्रिशियन
  • कारपेंटर
  • केबल-डीटीएच कर्मचारी
  • शेतीशी निगडीत कामं
  • शेतीशी निगडीत खरेदी-विक्री
  • कन्स्ट्रक्शन काम
  • मनरेगा
  • औद्योगिक क्षेत्र
  • लघु उद्योग
  • बँक, पोस्ट ऑफिस
  • हॉस्पिटल/नर्सिंग होम
  • छोट्या वित्तीय संस्था
  • कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी
  • नॉन बँकिंग फायनान्स
  • हाउसिंग फायनान्स
  • गावागावांती विट भट्ट्या

कोणाला सूट मिळणार नाही?

  • रेल्वे वाहतूक
  • बस वाहतूक
  • हवाई वाहतूक
  • शॉपिंग मॉल्स
  • चित्रपटगृह
  • शाळा-कॉलेज
  • टॅक्सी सेवा
संबंधित बातम्या :  Lockdown2 | ग्रीन, ऑरेंज झोनमधील उद्योग आजपासून अंशतः सुरु होणार! कोरोना लॉकडाऊन नियम : राज्यात 20 एप्रिलपासून काय सुरू होणार