Lance Naik Chandrashekhar Harbola : 19 कुमाऊँ रेजिमेंटचे लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांचे पार्थिव तब्बल 38 वर्षांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी पोहोचणार आहे. शहीद चंद्रशेखर हरबोला 38 वर्षांपूर्वी सियाचीनमध्ये गस्तीवर असताना हिमस्खलनामध्ये बळी पडले होते. ज्या 5 बेपत्ता जवानांचे मृतदेह बर्फात गाडले गेले त्यात चंद्रशेखर यांचाही समावेश होता. आता त्यांची 65 वर्षीय पत्नी आणि दोन मुली मंगळवारी त्यांना अंतिम श्रद्धांजली अर्पण करतील.


हरबोला यांच्या हौतात्म्यावेळी त्यांची मोठी मुलगी 8 वर्षांची आणि धाकटी मुलगी सुमारे 4 वर्षांची होती. हरबोला त्यांच्या डिस्क नंबरवरून ओळखले गेले. तो  क्रमांक त्यांना लष्कराने दिला होता.  हरबोला यांच्या डिस्कवर (4164584) हा क्रमांक लिहिला होता.


29 मे 1984 रोजी आले होते बर्फाचे वादळ


उत्तराखंडमधील अल्मोडा येथील द्वारहाट येथील हाथीगुर बिंता येथे राहणारे चंद्रशेखर त्यावेळी २८ वर्षांचे होते. 1975 मध्ये ते भारतीय सैन्यात दाखल झाले. 1984 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सियाचीनसाठी संघर्ष झाला होता. भारताने या मोहिमेला ऑपरेशन मेघदूत असे नाव दिले होते. 20 सदस्यीय गस्ती पथक हिमस्खलनामुळे बेपत्ता झाले होते. नंतर 15 जणांचे मृतदेह सापडले, मात्र 5 जणांचा शोध लागलाच नव्हता. 






लष्कराने दिलेल्या डिस्क क्रमांकावरून ओळख पटली 


अलीकडेच सियाचीन ग्लेशियरचा बर्फ वितळू लागल्यावर पुन्हा एकदा हरवलेल्या सैनिकांचा शोध सुरू करण्यात आला. या प्रयत्नादरम्यान लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला या आणखी एका सैनिकाचा मृतदेह हिमनदीवर बांधलेल्या जुन्या बंकरमध्ये सापडला. हरबोला त्यांच्या डिस्क नंबरवरून ओळखले गेले. तो  क्रमांक त्यांना लष्कराने दिला होता.  हरबोला यांच्या डिस्कवर (4164584) हा क्रमांक लिहिला होता.


इतर महत्वाच्या बातम्या