Coronavirus Cases Today in India :  देशातील कोरोना संसर्गात चढ-उतार दिसतोय. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढताना पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी दिवसभरात 14 हजार 917 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या 825 रुग्णांची वाढ झाली आहे. याआधी म्हणजे शनिवारी 14,092 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. यासोबतच देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या देशात 1 लाख 17 हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. ही संख्या काल 1 लाख 16 हजारांवर होती.


सक्रिय कोरोना रुग्णांमध्ये वाढ


देशातील सक्रिय रुग्णांची संख्येत वाढ झाली आहे. आता देशात 1 लाख 17 हजार 508 कोरोना रुग्ण आहेत. तर शनिवारी दिवसभरात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे 25 लाख 50 हजार 276 डोस देण्यात आले आहेत. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मता दर 7.52 टक्के, तर आठवड्याचा सकारात्मता दर 4.65 टक्के आहे. तसेच देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.54 टक्के आहे. 






महाराष्ट्रात 2082 कोरोना रूग्णांची नोंद


रविवारी महाराष्ट्रात 2082 कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे, तर तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी 1824 रूग्णांनी कोरोनावर मात केलीय. आजपर्यंत राज्यात 79 लाख 12 हजार 67 रूग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे राज्यातील रूग्णा बरे होण्याचे प्रमाण 98.01 टक्के झाले आहे. 


दिल्लीमध्ये नऊ जणांचा मृत्यू


राजधानी दिल्लीमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दिल्लीमध्ये दोन हजार 31 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 9 जणांचा मृत्यू झालाय. शुक्रवारच्या तुलनेत दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर कमी झाल्याचं पाहायला मिळतेय. कारण शुक्रवारी दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर 15 टक्केंपेक्षा जास्त झाला होता. शनिवारी दिल्लीतील पॉझिटिव्हिटी दर 12.34 टक्के इतका आहे. दिल्लीमधील सक्रीय रुग्णांची संख्या आठ हजार 105 इतकी झाली आहे. दिल्लीमध्ये वाढता संसर्ग पाहता पुन्हा मास्क सक्ती लागू करण्यात आली आहे.