मुंबई : टेलिकॉम सेक्टरमधील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स जिओ रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करणार आहे. येत्या वर्षात जिओ तब्बल 80 हजार तरुणांना नोकरीची दालनं खुली करणार आहे.

2018-19 या आर्थिक वर्षात 75 ते 80 हजार जणांना नोकरी देण्याचं उद्दिष्ट कंपनीने ठेवल्याचं जिओचे मुख्य एचआर ऑफिसर संजय जोग यांनी सांगितलं. जिओमध्ये सध्या 1 लाख 57 हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

रिलायन्स जिओने देशभरातील सहा हजार महाविद्यालयांसोबत टायअप केलं आहे. यामध्ये तंत्र महाविद्यालयांचाही समावेश आहे. यापैकी काही संस्थांमध्ये इंडस्ट्रीशी निगडीत अभ्याक्रम चालतात. त्यामुळे विद्यार्थी थेट कंपनीत काम करण्यास पात्र ठरतात.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करुनही काही नियुक्त्या केल्या जाणार आहेत. 60 ते 70 टक्के नियुक्त्या या कॉलेज किंवा कर्मचाऱ्यांच्या रेफरन्सने केल्या जाणार आहेत. सेल्स आणि टेक्निकल क्षेत्रातील 32 टक्के कर्मचाऱ्यांनी कंपनीला सोडचिठ्ठी दिली आहे.