नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजला 2017-18 या आर्थिक वर्षात 36 हजार कोटी रुपयांचा नफा झाल्याची घोषणा कंपनीने केली. विशेष म्हणजे, रिलायन्स जिओने आपल्या पहिल्याच आर्थिक वर्षात मोठ्या नफ्याची नोंद केली आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीज

रिलायन्स इंडस्ट्रीजचा एकूण  व्यवसाय 4.30 लाख कोटी रुपयांहून अधिक झाला. 2016-17 या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 30 टक्क्यांनी वाढला. या आर्थिक वर्षात 36 हजार कोटींहून अधिक नफा झाला. 2016-17 च्या तुलनेत हा नफा 20 टक्के जास्त आहे.

रिलायन्स जिओ

रिलायन्स जिओने आपल्या पहिल्याच आर्थिक वर्षात दमदार कामगिरी केली आहे. एकूण 23 हजार 714 कोटी किंमतीच्या सेवा पुरवणाऱ्या जिओने गेल्या वर्षभरात एकूण 20 हजार 154 कोटींचा खर्च केला. म्हणजेच 2017-18 या आर्थिक वर्षात रिलायन्स जिओने 723 कोटींचा नफा मिळवला.

आपल्या एन्ट्रीनेच टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घालणाऱ्या आणि प्रस्थापित कंपन्यांना दणका देणाऱ्या रिलायन्स जिओने लॉन्चिंगच्या पहिल्याच वर्षात मोठी मजल मारली आहे.