मयुरभंज, ओरिसा : न्याय मिळावण्यासाठी ओरिसामधल्या कार्तिक सिंग यांच्यावर 'श्रावणबाळ' होण्याची वेळ आली आहे. आदिवासी भागात राहणाऱ्या कार्तिक यांना न्यायासाठी चक्क खांद्यावर कावड घेत त्यात आईवडिलांना बसवत 40 किलोमीटर पायपीट करावी लागली.


ओरिसाच्या मयुरभंज जिल्ह्यातील मोरोदा गावात राहणाऱ्या कार्तिक सिंग यांच्यावर खोटा गुन्हा नोंदवण्यात आला. त्यामुळे 2009 साली त्यांना 18 दिवस तुरुंगवास ठोठवण्यात आला होता. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकलं.

कार्तिक सिंग यांना नोकरी मिळत नव्हती. समाजाने बहिष्कार टाकल्याने त्यांचं लग्नही जमत नाही. आई-वडिलांची काळजी घ्यायला घरात कोणीही नसल्यानं उच्चशिक्षित असूनही नोकरीसाठी ते शहरात जाऊ शकत नव्हते. कर्जाचा डोंगर साचल्यामुळे आई-वडिलांचं पोट भरण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत.

अखेर आई-वडिलांचे डोळे मिटवण्याआधी आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी कार्तिक यांची न्यायमंदिरात पायपीट सुरु आहे. मयुरभंज पोलिसांनी याआधीही अनेकांच्या विरोधात खोटे गुन्हा दाखल केल्याचा आरोप आहे. पोलिसांमुळे अनेक निष्पाप व्यक्तींना खोट्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली.' अशी माहिती वकिल प्रभूदाव मरांडे यांनी दिली आहे.

पाहा व्हिडिओ :

https://twitter.com/ANI/status/903447216081125376