नवी दिल्ली : पंजाब अँन्ड महाराष्ट्र को- ऑपरेटिव्ह बँकेबाबत ( पीएमसी) मोठी बातमी आली आहे. कर्ज घोटाळ्यामुळे अर्थिक निर्बंध आलेल्या पीएमसी बँकेसंबधी रिझर्व्ह बँकऑफ इंडिया (आरबीआय) 30 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून निर्णय देणार आहे. आरबीआयची पीएमसी बँकेसंबंधी 25 ऑक्टोबरला बैठक होणार आहे. या बैठकीत घेण्यात येणाऱ्या निर्णयाची माहिती 30 ऑक्टोबरला देणार आहे. 25 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत फक्त आरबीआयचे प्रतिनधी असणार आहे.
आज पीएमसी खातेधारांशी झालेल्या बैठकीत आरबीआयने ही माहिती दिली आहे. बँकेच्या खातेदारांचा पैसा सुरक्षित आहे. 30 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेत खातेदारांना निर्णयाची माहिती देण्यात येणार असल्याचे आरबीआयने या वेळी सांगितले.
आझाद मैदानात पीएमसी खातेदार गेले काही दिवस आंदोलन करत आहे. आंदोलनानंतर बँकेच्या 6 खातेदारांची आरबीआयच्या अधिकाऱ्याशी बैठक झाली. या बैठकीत बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास उपस्थित नव्हते. पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या आरबीआयच्या अधिकाऱ्याशी झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते चरण सिंह सप्रा म्हणाले, पीमएसी बँकेच्या 16000 खातेदारांनी दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या खातेदारांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबीयांना 25 लाख रूपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी देखील खातेदारांनी या वेळी केली आहे. चरण सिंह सप्रा हे आरबीआय़च्या अधिकाऱ्याशी झालेल्या बैठकीत होते आणि त्यांनी आरबीआय़च्या अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली.
आज झालेल्या बैठकीविषयीची माहिती लिखीत स्वरुपात दिलेला नाही. जर पीएमसी बँकेच्या खातेदारांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा खातेदारांनी दिला आहे.
पीमएसी बँकेसंबंधी 30 ऑक्टोबरला आरबीआय निर्णय देणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2019 07:19 PM (IST)
पीएमसी बँकेसंबंधीचा निर्णय आरबीआय पत्रकार परिषदेच्या माध्यामातून 30 ऑक्टोबरला देणार आहे. आज खातेदारांशी झालेल्या बैठकीत आरबीआयने ही माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -