नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण होण्यासाठी काहीच दिवस बाकी आहेत. नोटाबंदीच्या काळात रिझर्व बँकेला परिस्थितीनुसार दररोज काही तरी निर्णय जाहीर करावे लागले. कधी पैसे काढण्याची मर्यादा वाढवली, तर कधी पैसे टाकण्यावर मर्यादा आणली. याच सर्व निर्णयांचा आढावा...


8 नोव्हेंबर 2016

  1. 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा किंवा बदलण्याची मुभा

  2. प्रतिव्यक्ती केवळ 4 हजार रुपये बदलून मिळणार

  3. 4 हजार रुपयेच बदलण्याच्या निर्णयावरुन 23 नोव्हेंबरला माघार

  4. नोटा जमा करण्यावर मर्यादा नाही, पण केवायसी नसेल तर 50 हजार मर्यादा

  5. जेवढ्या रकमेच्या जुन्या नोटा जमा कराल, तेवढी रक्कम खात्यात जमा होणार

  6. ओळखपत्र सादर करुन तुम्ही थर्ड पार्टीला पैसे ट्रान्सफर करु शकता

  7. एकावेळी 10 हजार आणि आठवड्यात 20 हजार रुपये काढता येणार

  8. चेक, डेबिट-क्रेडिट कार्डने पैसे काढण्यावर मर्यादा नाही

  9. एटीएममधून केवळ 2 हजार रुपये काढता येणार, 19 नोव्हेंबरपासून ही मर्यादा 4 हजार

  10. 30 डिसेंबरनंतर शपथपत्रासह जुन्या नोटा रिझर्व बँकेत जमा करा


 

9 नोव्हेंबर 2016

11. 9 नोव्हेंबर रोजी बँकांना सुट्टी असेल

10 नोव्हेंबर 2016

12. सुरुवातीचे 72 तास रुग्णालयं, रेल्वे, पेट्रोल पंप, दूध केंद्रांवर जुन्या नोटा चालणार

11 नोव्हेंबर 2016

  1. महत्वाच्या ठिकाणी जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत नोव्हेंबर

  2. कोर्ट फीसाठी देखील जुन्या नोटांचा वापर करता येणार

  3. सहकारी ग्राहक भंडारात व्यवहारासाठी ओळखपत्र आवश्यक

  4. अत्यावश्यक सेवांची बिलं व्यक्तीगत अकाऊंटमधूनच भरता येतील

  5. महामार्गावर टोलमाफी, सुरुवातील 24 नोव्हेंबरपर्यंत, नंतर 2 डिसेंबरपर्यंत मुभा


 

13 नोव्हेंबर 2016

  1. मुख्य सचिवांनी चलन तुटवडा असणाऱ्या परिसरात योग्य कारवाई करुन चलन पुरवठा करणे

  2. चेक, डीडीने पेमेंट न स्वीकारणाऱ्या हॉस्पिटल्सविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करता येणार

  3. रुग्णांच्या सुविधेसाठी बँकांना आपत्कालीन पेमेंटसाठी सहकार्य करण्याच्या सूचना

  4. बँकांना ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी वेगळ्या रांगांची व्यवस्था करण्याच्या सूचना

  5. ग्रामीण भागातील लोकांची खाती उघडण्याच्या, त्यांना सहकार्य करण्याच्या बँकांना सूचना

  6. बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा अडीच हजार रुपये

  7. बँकेत नोटाबदलीची मर्यादा 4 हजारांवरुन साडे चार करण्यात आली

  8. एटीएमद्वारे पैसे काढण्याची मर्यादा 2 हजारांवरुन अडीच हजार प्रतिदिन केली

  9. बँकेतून आठवड्यात पैसे काढण्याची मर्यादा 20 हजारांवरुन 24 हजार करण्यात आली

  10. बँकांना मोबाईल वॉलेट, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाईन सुविधा ग्राहकांना देण्याच्या सूचना

  11. पेन्शनर्ससाठी हयातीचा दाखला जमा करण्याची मुदत 15 जानेवारी 2017 पर्यंत वाढवली

  12. बँकांमध्ये पैसे बदलून बोगसगिरीला आळा घालण्यासाठी बोटावर शाई लावण्याचा निर्णय

  13. जिल्हा सहकारी बँकांना पाचशे आणि एक हजारच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी


 

17 नोव्हेंबर 2016

  1. शेतकऱ्यांना आठवड्याला 25 हजार रुपये खात्यातून काढण्याची मुभा

  2. शेतकऱ्यांना चेक किंवा आरटीजीएसने आठवड्याला 25 हजार रुपये काढता येणार

  3. एपीएमसीतील व्यापाऱ्यांना आठवड्याला खात्यातून 50 हजार रुपये काढण्याची मुभा

  4. पीक विमा हप्ता भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवण्यात आली

  5. लग्नासाठी बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार

  6. देशभरात बँकेतून पाचशे आणि एक हजारच्या नोटा बदलण्याची मर्यादा 18 नोव्हेंबर 2016 रोजी 4500 रुपयांवरुन 2 हजार रुपयांवर करण्यात आली

  7. केंद्रीय संरक्षण आणि निम लष्करी दल, रेल्वे आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील 'क' दर्जाच्या कर्मचाऱ्यांना पगारापैकी 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम रोख स्वरुपात काढण्याची मुभा. नोव्हेंबर 2016 च्या पगारातून ही रक्कम वळती करण्यात आली.


 

21 नोव्हेंबर 2016


  1. शेतकऱ्यांना जुन्या नोटांच्या मोबदल्यात बियाणे खरेदीची मुभा


 

23 नोव्हेंबर 2016

  1. आरबीआय आणि बँकांकडून जिल्हा सहकारी बँकांना कॅश उपलब्ध करण्याचे आदेश



  1. छोट्या कर्जदारांना (1 कोटी रुपयांपर्यंत) कर्ज चुकते करण्याची मुदत 60 दिवसांनी वाढवली. यामध्ये वैयक्तिक कर्ज, पीक कर्ज, गृहकर्ज यांचा समावेश



  1. रुपे कार्डावरील विनिमय कर 31 डिसेंबर 2016 पर्यंत रद्द. जनधन खात्यांसह 30 कोटी रुपे कार्डांचं वाटप.



  1. ई-वॉलेटसाठी मासिक व्यवहार मर्यादा 10 हजारांवरुन 20 हजारांपर्यंत वाढवली.



  1. डिसेंबर 2016 पर्यंत ई-तिकीटांवरील सेवाकर माफ. ऑनलाईन ई-तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांची संख्या 58 टक्के, तर काऊंटरवर खरेदी करणाऱ्यांची संख्या 42 टक्के



  1. बँकिंग किंवा पेमेंटशी निगडीत व्यवहारांचे एसएमएस चार्जेस दीड रुपयांवरुन 50 पैशांवर



  1. टोलनाक्यांवर कॅशलेस ऑटोकलेक्शन करता यावं, यासाठी सर्व नव्या वाहनांना आरएफआयडी असलेले ईटीसी पुरवण्याचे ऑटोमोबाईल निर्मात्यांना आदेश



  1. सरकारी संस्था, पीएसयूना इंटरनेट बँकिंग, डिजिटल कार्ड्स यासारख्या ऑनलाईन पेमेंट पद्धतींचा वापर करण्याचे आदेश


 

24 नोव्हेंबर 2016

  1. पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलण्याची मुदत संपुष्टात. जुन्या नोटा बँकेत फक्त जमा करता येणार, त्यांच्या मोबदल्यात नवीन नोटा मिळणार नाहीत.



  1. परदेशी नागरिक (पर्यटकांचाही समावेश) भारतीय चलनातील जुन्या नोटांच्या मोबदल्यात परदेशी चलन घेऊ शकतात. दर आठवड्याला फक्त पाच हजार रुपयांपर्यंतच चलन बदलता येणार



  1. एक हजार रुपयांची नोट चलनातून पूर्णपणे बाद, पेट्रोल पंप, रेल्वे, दूधकेंद्र यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणीही एक हजाराची नोट स्वीकारली जाणार नाही.



  1. 500 रुपयांच्या जुन्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत महत्त्वाच्या ठिकाणीच स्वीकारली जाणार


अ) केंद्र सरकार आणि राज्य सरकारी शाळा, महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांच्या फी

ब) केंद्र आणि राज्य सरकारच्या महाविद्यालयातील फी

क) प्री-पेड मोबाइलच्या टॉप अपसाठी

ड)  ग्राहक सहकारी भांडार

ई) पाणी बिल आणि वीज बिल

याशिवाय सरकारी रुग्णालयं, विमानतळावरील तिकीट, दूध केंद्र, स्मशानभूमी, पेट्रोल पंप, मेडिकल, एलपीजी गॅस सिलेंडर याठिकाणीही स्वीकारल्या जाणार

8 डिसेंबर 2016

  1. 2 हजार रुपयांपर्यंतचे डिजिटल व्यवहार करमुक्त



  1. 10 डिसेंबरपासून रेल्वे स्टेशनवरही 500 च्या जुन्या नोटा बंद



  1. पेट्रोल-डिझेलच्या डिजिटल पेमेंटवर 0.75 टक्के सूट



  1. सार्वजनिक विमा कंपन्यांकडून सामान्य विमा पॉलिसींच्या हप्त्यांवर 10 टक्के सूट, तर नव्या ऑनलाईन पॉलिसींवर 8 टक्क्यांची सूट



  1. केवळ ऑनलाईन रेल्वे तिकीट खरेदी केल्यास 10 लाखांचा मोफत प्रवासी विमा


 

15 डिसेंबर 2016

  1. जिल्हा बँकांवरील निर्बंध अंशत: उठवले. बँकांनी जमा केलेले पैसे, डिपॉझिट करण्याची मुभा


 

19 डिसेंबर 2016

  1. 30 डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच 5 हजारपेक्षा जास्तीच्या जुन्या नोटा बँकेत भरु शकता.


 

20 डिसेंबर 2016

  1. 2 कोटीपर्यंत व्यवसाय असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांनी डिजिटल व्यवहार केल्यास 2 टक्के सूट


 

21 डिसेंबर 2016

  1. RBI चं एक पाऊल मागे, केवायसी खातेधारकांना 5 हजारांची मर्यादा नाही, नवं नोटफिकेशन जारी