RBI Governor : गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढत आहे. वाढत्या महागाईवरून रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत (Shaktikanta Das)  दास यांनी चिंता व्यक्त केलीय. आर्थिक घडामोडींमध्ये वाढ झाली असली तरी, महागाईचा सततचा उच्च दर हा अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचा विषय आहे, असे शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी या महिन्याच्या सुरुवातीला पॉलिसी रेट 0.50 टक्क्यांनी वाढवला आहे. परंतु, अद्याप वाढत्या महागाईपासून दिलासा मिळालेला नाही.   
 
बुधवारी जाहीर झालेल्या केंद्रीय बँकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) बैठकीच्या तपशीलातून ही माहिती प्राप्त झाली आहे. दास यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय एमपीसीने 8 जून रोजी आर्थिक धोरणाचा आढावा सादर केला. यामध्ये, प्रमुख पॉलिसी रेट रेपोमध्ये सलग दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली.


तीन दिवसीय बैठकीच्या तपशीलानुसार, शक्तिकांत दास म्हणाले, महागाईचा उच्च दर हा चिंतेचा विषय आहे. परंतु आर्थिक क्रियाकलापांचे पुनरुज्जीवन सुरू आहे आणि त्याला गती मिळत आहे. महागाईचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी धोरणात्मक दरात आणखी वाढ करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे मी रेपो दरात 0.50 टक्के वाढ करण्याच्या बाजूने मतदान करेन.  


रेपो रेट 4.9 टक्क्यांपर्यंत
दास म्हणाले, रेपो दरात वाढ झाल्यामुळे किंमत स्थिरतेसाठी आरबीआयची वचनबद्धता मजबूत होईल. चलनवाढ नियंत्रणात ठेवणे हे मध्यवर्ती बँकेचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. मध्यम कालावधीत शाश्वत वाढीसाठी ही पूर्वअट आहे. समितीच्या सर्व सहा सदस्यांनी रेपो दर 0.50 टक्क्यांनी वाढवून 4.9 टक्के करण्याच्या बाजूने मतदान केले. 


वाढत्या इंधन दरामुळे गेल्या काही दिवसांपासून देशात महागाई वाढताना दिसत आहे. आधी कोरोना महामारीमुळे संकटात सापडलेला सामान्य माणूस या महागाईच्या कंटतात लोटला गेलाय. त्यामुळे वाढती महागाई हा चिंतेचा विषय आहे, असे अनेक तज्ञ्जांचे मत आहे. 


महत्वाच्या बातम्या


HDFC Life : एचडीएफसी लाईफच्या पॉलिसीधारकांसाठी खुशखबर! कंपनीने जाहीर केला बोनस  


Jain Irrigation : उद्योग विश्वातील मोठी बातमी! जैन इरिगेशन कंपनीचा जागतिक सिंचन व्यवसाय 'या' कंपनीत विलिन