मुंबई : बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. परंतु, अलिकडच्या काळात या सोशल मीडियाचा वापर फक्त भावना व्यक्त करण्यापूरता मर्यादित राहिला नसून माहितीची आदान प्रदान करण्यापर्यंत पोहोचला आहे. सर्वच क्षेत्रातील लोक आता या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यातच एखादी पोस्ट आपल्याला आवडल्यानंतर ती रीपोस्ट करण्याचीही पद्धत रूढ झाली आहे. सध्या असेच एक ट्विट (twitters) चर्चेत आहे, जे उद्योग क्षेत्रात 2021 या वर्षात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट केले गेले आहे. एअर इंडिया कंपनी (Air India) सरकारकडून टाटा समुहाकडे परत आल्यानंतर टाटा समुहाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी त्यासंदर्भात ट्विट केले होते. टाटा यांचे हे ट्विट 2021 मध्ये उद्योग क्षेत्रात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट करण्यात आले आहे.
जवळपास 90 वर्षापूर्वी टाटा समुहाने स्थापन केलेली एअर इंडिया ही कंपनी गेल्या 70 वर्षापासून सरकारी मालकीची होती. ती गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त बोली लावून रतन टाटा यांनी खरेदी केली. ही कंपनी टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी एअर इंडियाचे स्वागत करणारे ट्विट केले होते. सत्तर वर्ष एअर इंडिया सरकारी मालकीच्या राहिल्यानंतर ती परत टाटा समुहात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करताना, रतन टाटा यांनी (@RNTata2000) एअर इंडियाच्या सुरुवातीच्या विमानाच्या फोटोसह “वेलकम बॅक, एअर इंडिया” अशी टॅगलाईन देऊन ट्विट केले होते. टाटा यांनी हे ट्विट केल्यानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी हे ट्वीट रिट्विट आणि लाईक केले. तब्बल 19 लाख तीन हजार जणांनी या ट्विटला रिप्लाय दिला आहे. तर 91 लाख एक हजार लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. 40 लाख चार हजार लोकांनी ते लाईक केले आहे.
सर्वात जास्त बोली लावून परत घेतली एअर इंडिया
टाटा सन्सने (Tata Sons) ऑक्टोबर महिन्यात एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंवणुकीसाठी लावलेली बोली जिंकली. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी 15100 कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं.
फक्त दोन लाखांच्या भांडवलावर झाली होती एइर इंडियाची स्थापना
टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती. जेआरडी टाटा म्हणजे जहांगीर रतनभॉय दादाभाई टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते. टाटा एअरलाईन्सची सुरुवात फक्त दोन लाख रुपयांच्या भांडवलावर झाली होती. टाटा एअर लाईन्सचा पहिला प्रवास हा कराची ते मुंबई असा होता.
संबंधित बातम्या
Air India Bid: एअर इंडिया पुन्हा TATA कडे! कंपनीने सर्वात मोठी बोली लावून घेतला ताबा
Air India : 'वेलकम बॅक, एअर इंडिया...', मालकी मिळाल्यानंतर रतन टाटाची भावनिक प्रतिक्रिया