IIHB’s Power Couples Survey : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) यांनी एक वार्षिक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणानुसार नुकतीच भारततील पॉवर कपल्सची यादी तयार करण्यात आली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल्सला मागे टाकून रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries Limited) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी (Nita Ambani) यांनी पॉवर कपल्सच्या यादीत प्रथम स्थान मिळवलं आहे. पाहूयात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स यांनी तयार केलेली पॉवर कपल्सची यादी-
कॉरपोरेट वर्ल्डमधील जोड्याइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रँड्स (IIHB) यांनी जाहिर केलेल्या यादीमध्ये पाच कॉरपोरेट वर्ल्डमधील जोड्यांचा समावेश टॉप 20 जोड्यांमध्ये झाला आहे. या यादीमध्ये इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती दहाव्या क्रमांकावर आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला आणि त्यांची पत्नी नताशा पूनावाला यांचे नाव या यादीत 11 व्या क्रमांकावर आहे. विप्रो कंपनीचे अजीम आणि यास्मीन प्रेमजी हे 16 व्या स्थानावर आहेत. महेंद्र कंपनीचे आनंद आणि अनुराधा महिंद्रा हे पॉवर कपल्सच्या यादीत 19 व्या क्रमांकावर तर आदित्य बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम आणि नीरजा बिर्ला हे 20 व्या क्रमांकावर आहेत.
टॉप-10 पॉवर कपल्स जोड्या
1. मुकेश अंबानी- नीता अंबानी
2- रणवीर सिंह-दीपिका पादूकोण 3-विराट कोहली - अनुष्का शर्मा4-रणबीर कपूर-आलिया भट5-अक्षय कुमार- ट्वींकल 6-शाहरूख खान-गौरी खान7. सैफ अली खान-करिना कपूर8. अमिताभ बच्चन- जया बच्चन 9. विकी कौशल कतरिना कैफ
10. नारायण मूर्ती- सुधा मूर्ती
11.अदर पुनावाला-नताशा पूनावाला12- आदित्य चोप्रा- राणी मुखर्जी 13- अजय देवगण- काजोल 14- प्रियंका चोप्रा- निक जोनस15 अभिषेख बच्चन- ऐश्वर्या बच्चन
16. अजीम प्रेमजी आणि यास्मीन प्रेमजी17- सचिन तेंडूलकर- अंजली तेंडूलकर18- एम एस धोनी- साक्षी धोनी
19. आनंद महिंद्रा आणि अनुराधा महिंद्रा
20. कुमार मंगलम आणि नीरजा बिर्ला
संबंधित बातम्या :