Rashtrapati Bhavan Security Breach : राजधानी दिल्लीमध्ये असलेल्या राष्ट्रपती भवनाला कडेकोट सुरक्षा असते. पण या सुरक्षेत मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. सोमवारी रात्री एक मुलगा आणि मुलीनं गाडीनं मुख्य गेटमधून राष्ट्रपती भवनात प्रवेश केला होता. सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, गेटमधून सर्वसामान्यांना प्रवेश नसाताना त्यांनी कसा प्रवेश केला? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनेनंतर सुरक्षा एजन्सी सतर्क झाल्या आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती भवनात प्रवेश करणारा मुलगा आणि मुलगी दारुच्या नशेत होते. या दोघांनी प्रवेश केल्यानंतर उपस्थित सुरक्षारक्षक सतर्क झाले होते. 


सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. एका मुलानं मुख्य गेटमधून गाडी राष्ट्रपती भवनात नेली. त्यामुलासोबत गाडीमध्ये एक मुलगी होती. गेट क्रमांक 35 मधून या मुलानं गाडी राष्ट्रपती भवनात नेली. तीन बॅरिकेट्स पार करुन आतमध्ये पोहचली होती.त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दोघांनी ताब्यात घेतल्यानंतर चौकशी करण्यात आली. पोलिसांनी या दोघांना कोर्टात हजर केलं. न्यायालयानं या दोघांनी कोठडी सुनावली आहे. 


या दोघांनी राष्ट्रपती भवनात चुकून प्रवेश केला होता की जाणूनबूजून? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलीस याबाबतचा तपास घेत आहेत. या प्रकरणानंतर राष्ट्रपती भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं अंदोलन सुरु असल्यामुळे मोठी सुरक्षाव्यवस्था तैणात करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन, शास्त्री भवन आणि पीएमओमध्ये प्रवेश करण्यावेळी कसून चौकशी आणि तपासणी केली जाते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha 



संबधित बातम्या :


राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन सर्वसामान्यांसाठी खुलं
Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन
शिवरायांच्या प्रतिमेमुळे राष्ट्रपती भवनातील कमतरता पूर्ण : कोविंद