चंदिगड: आजवर आपण पतंजलीची टूथपेस्ट, पतंजली नूडल्स, पतंजली ब्यूटी प्रोडक्ट आपण पाहिली असतील पण आता पतंजली उद्योग समूह एका नव्या व्यवसायात उडी घेत आहे. तो देखील हॉटेल व्यवसाय. पाहा काय आहे पतंजली हॉटेल आणि त्याची खासियत.


चंदिगडच्या झिराकपूरमधलं पतंजलीचं पहिलं वहिलं पौष्टिक रेस्टॉरंट सुरु करण्यात आलं आहे. इथे फक्त पतंजलीचेच प्रोडक्ट वापरले जातात.

कुठे गरमा गरम रोटी सब्जी तर कुठे पुलाव आणि सलॅड. सोबतच खास उन्हाळ्यासाठी पतंजली स्पेशल कैराचं हिरवंगार पन्ह. चमचमीत चवीसोबतच तुमच्या आरोग्याची काळजीही पतंजलीने घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे 'घर का खाना' अशी विशेष डिशही तुम्ही ऑर्डर करू शकता.

सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पौष्टिक रेस्टॉरंटमध्ये जाताना तुम्हाला जास्त बजेट सांभाळायची गरज नाही. कारण सगळे मेनू जवळजवळ आपल्या खिशाला परवडू शकतात.

त्यामुळे पतंजलीने रेस्टॉरंटच्या उद्योगात उडी घेतली असली तरी ही पौष्टीक चव चाखायला इथे किती खवय्ये भेट देणार? यावरच पतंजलीच्या पुढच्या रेस्टॉरंटची भविष्यं अवलंबून आहेत.