नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा राज्यसभेत न होता राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडला. देशभरातून 20 राज्यांमध्ये निवडून आलेल्या 62 खासदारांचा शपथविधी आज पार पडला. जे खासदार आज शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांचा शपथविधी अधिवेशनाच्या वेळी पार पडणार आहे. आज ज्या खासदारांनी शपथ घेतली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, भाजपचे उदयनराजे भोसले, शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डाँ. भागवत कराड यांचा समावेश होता.


राज्यसभेऐवजी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेचा हात धरलेल्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डाँ. भागवत कराड, शरद पवार आणि भाजपच्या उदयनराजे यांनी शपथ घेतली. यापैकी शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसचे राजीव सातव, भाजपचे डॉ. भागवत कराड यांनी मराठीतून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदीतून शपथ घेतली. तसेच पक्षांतर करून राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. तसेच शपथ घेतल्यानंतर त्यांनी जय भवानी जय शिवाजी ची घोषणाही केली.


पाहा व्हिडीओ : राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा 



मध्यप्रदेशात झालेल्या सत्तापालटानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचाही आज शपथविधी सोहळा पार पडला. तसेच काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही आज खासदारकीची शपथ घेतली.


महाराष्ट्रातील या खासदारांनी घेतली शपथ :


शरद पवार
उदयनराजे भोसले
प्रियांका चतुर्वेदी
डॉ. भागवत कराड
राजीव सातव
रामदास आठवले


दरम्यान, देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे संसदेचं कामकाज पुढे ढकलण्यात आलं होतं. आजा खासदारांच्या शपथविधी सोहळ्यासाठी संसदेची दारं खुली करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत हा सोहळा पार पडला.


महत्त्वाच्या बातम्या : 


एकनाथ खडसे यांना राज्यसभेवर संधी न मिळाल्यानं दुःख; मी नाराज नाही : संजय काकडे


महाविकास आघाडीमधील राज्यसभेची चौथी जागा राष्ट्रवादीच्या खात्यात


राज्यसभेच्या निवडणुकीत पळवापळवीचं राजकारण, तीन राज्यांमध्ये भाजपचं काँग्रेसपुढे आव्हान