मुंबई: राज्यसभेच्या चार राज्यातील 16 जागांसाठी आज निवडणूक पार पडली. त्यामध्ये हरियाणा, कर्नाटक आणि राजस्थानचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण 57 जागांसाठी निवडणूक होणार होती. पण त्यातल्या 41 जागा बिनविरोध झाल्या. म्हणून मग महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि हरिणायात निवडणूक लागली. महाराष्ट्रात तर 24 वर्षांनंतर राज्यसभेसाठी मतदानाची वेळ आली. 


तीन राज्यांतील निकालाची स्थिती


कर्नाटकात भाजप किंग
कर्नाटकमध्ये झालेल्या राज्यसभेच्या चार जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. भाजपच्या वतीनं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या निवडणूक लढवत होत्या, त्यांना पहिल्या पसंतीची 46 मतं मिळाली. तर काँग्रेसचे जयराम रमेशही निवडून आले आहेत. 


4 पैकी 3 ठिकाणी भाजपची बाजी, एका जागेवर काँग्रेस 


कर्नाटकातील विजयी उमेदवार



  • निर्मला सीतारमण - भाजप 46 मतं

  • जग्गेश- भाजप 46 मतं

  • लहर सिंह सिरोया- भाजप 33 मतं

  • जयराम रमेश- काँग्रेस 46 मतं


क्रॉस वोटिंगमुळे जेडीएसचं नुकसान


राजस्थानमध्ये अशोक गहलोतच किंग
राजस्थानमध्ये आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 


4 पैकी 3 ठिकाणी काँग्रेसचीबाजी



  • रणदीप सुरजेवाला- कांग्रेस 43 मतं 

  • मुकुल वासनिक- काँग्रेस 42 मतं

  • प्रमोद तिवारी- काँग्रेस 41 मतं 

  • घनश्याम तिवारी- 43 मतं

  • डॉ. सुभाष चंद्र यांना 30 मते मिळाली, ते पराभूत झाले.


हरियाणा
हरियाणामध्ये दोन जागांवर भाजप आणि काँग्रेस उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत. भाजपकडून कृष्ण पाल पंवार तर अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा विजयी झाले आहेत. काँग्रेसचे एक मत बाद ठरल्याने अजय माकन यांचा पराभव झाला आहे. 


2 पैकी 1-1, भाजप आणि काँग्रेस 



  • भाजप - कृष्ण पाल पंवार- 31

  • अपक्ष - कार्तिकेय शर्मा -

  • काँग्रेस - अजय माकन- पराभूत


आठ तासांच्या विलंबानंतर मतमोजणी आणि निकाल.