राज्यसभा : यूपीएमध्ये एकजूटता नाही, राष्ट्रवादीचा लढण्यास नकार?

हरीवंश यांच्याविरोधात यूपीएमध्ये एकजूटता नसल्याचं दिसतंय. कारण, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे.

Continues below advertisement
नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने जेडीयूचे खासदार हरीवंश यांना उमेदवारी दिली आहे. मात्र हरीवंश यांच्याविरोधात यूपीएमध्ये एकजूटता नसल्याचं दिसतंय. कारण, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांना विरोधकांकडून उमेदवारी दिली जाईल, असं बोललं जात होतं. उपसभापतीपदासाठी नऊ ऑगस्टला म्हणजे उद्या निवडणूक होणार आहे. विरोधकांची आज सायंकाळी बैठकही होईल. मात्र विजयासाठी आवश्यक मतं जुळत नसल्याने राष्ट्रवादीने उमेदवार देण्यास नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, बीजेडी प्रवक्तांच्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे समर्थनाची मागणी केली आहे. त्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशीही नितीश कुमार यांनी फोनवरुन बातचीत केली. या निवडणुकीत एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांकडे आवश्यक जागा नाहीत. त्यामुळे आकड्यांची जुळवाजुळव करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे राज्यसभेत नऊ जागा असणारा बीजू जनता दल हा ओदिशाचा पक्ष किंगमेकर भूमिकेत आहे. राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा? (एकूण 245 जागा, रिक्त 1) एनडीए भाजप 73 जेडीयू 6 शिवसेना 3 अकाली दल 3 एआयएडीएमके 13 आरपीआय 1 सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1 तेलंगणा राष्ट्र समिती 6 नागा पिपल्स फ्रंट 1 अपक्ष 4 नामनिर्देशित 3 एकूण 115 यूपीए काँग्रेस 50 समाजवादी पक्ष 13 राष्ट्रवादी काँग्रेस 4 डीएमके 4 आरजेडी 5 इंडियन युनियन मुस्लीम लीग 1 केरळ काँग्रेस (एम) झारखंड मुक्ती मोर्चा 0 सीपीआयएम 5 बसपा 4 सीपीआय 2 तेलुगू देसम पार्टी 6 जेडीएस 1 तृणमूल काँग्रेस 13 आम आदमी पक्ष 3 नामनिर्देशित 1 एकूण 113 इतर बिजू जनता दल 9 वायएसआर काँग्रेस 2 इंडियन नॅशनल लोक दल 1 पीडीपी 2 अपक्ष 2 एकूण 16
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola