नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी नऊ ऑगस्टला मतदान होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची मुदत आज दुपारी 12 वाजता संपत आहे. एनडीएचे उमेदवार हरीवंश यांच्याविरोधात यूपीएकडे काँग्रेसचे राज्यसभा खासदार बीके हरीप्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण या निवडणुकीत यूपीएच्या उमेदवार मानल्या जात होत्या. मात्र विजयासाठी आवश्यक मतांची जुळवाजुळव होत नसल्याने राष्ट्रवादीने उमेदवार देण्यास नकार दिली. त्यानंतर काँग्रेसने आपल्याच पक्षातल्या उमेदवाराला संधी दिली आहे.

बीजेडीचं समर्थन कुणाला?

बीजेडी प्रवक्तांच्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याकडे समर्थनाची मागणी केली आहे. त्यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशीही नितीश कुमार यांनी फोनवरुन बातचीत केली.

या निवडणुकीत एनडीए आणि यूपीए दोन्ही पक्षांकडे आवश्यक जागा नाहीत. त्यामुळे आकड्यांची जुळवाजुळव करण्याचं मोठं आव्हान आहे. त्यामुळे राज्यसभेत नऊ जागा असणारा बीजू जनता दल हा ओदिशाचा पक्ष किंगमेकर भूमिकेत आहे.

राज्यसभेत कोणत्या पक्षाकडे किती जागा? (एकूण 245 जागा, रिक्त 1)

एनडीए

भाजप 73

जेडीयू 6

शिवसेना 3

अकाली दल 3

एआयएडीएमके 13

आरपीआय 1

सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट 1

तेलंगणा राष्ट्र समिती 6

नागा पिपल्स फ्रंट 1

अपक्ष 4

नामनिर्देशित 3

एकूण 115

यूपीए

काँग्रेस 50

समाजवादी पक्ष 13

राष्ट्रवादी काँग्रेस 4

डीएमके 4

आरजेडी 5

इंडियन युनियन मुस्लीम लीग 1

केरळ काँग्रेस (एम)

झारखंड मुक्ती मोर्चा 0

सीपीआयएम 5

बसपा 4

सीपीआय 2

तेलुगू देसम पार्टी 6

जेडीएस 1

तृणमूल काँग्रेस 13

आम आदमी पक्ष 3

नामनिर्देशित 1

एकूण 113

इतर

बिजू जनता दल 9

वायएसआर काँग्रेस 2

इंडियन नॅशनल लोक दल 1

पीडीपी 2

अपक्ष 2

एकूण 16