नवी दिल्ली :  सचिन पायलट आणि 18 अन्य बंडखोर काँग्रेस आमदारांच्या वतीने राजस्थान हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज दुपारी एक वाजता सुनावणी होणार आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांच्यासह 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी  नोटीस जारी केली आहे. या नोटिशीविरोधात पायलट गुरुवारी राजस्थान हायकोर्टात गेले होते. त्यांचा आरोप आहे की, विधानसभा अध्यक्षांनी राज्याचे मुख्यमंत्री अशोक गहलोत हे इशाऱ्यावर काम करत आहेत. यावेळी कोर्टानं सुनावणी पुढं ढकलली होती. कारण पायलट गटाने याचिकेसंदर्भात अभ्यासासाठी वेळ मागीतला होता.


दरम्यान राजस्थान हायकोर्टात सचिन पायलट यांची बाजू मुकुल रोहतगी, हरिश साळवे मांडत आहेत. तर अभिषेक मनु सिंघवी हे गहलोत सरकारची बाजू मांडत आहेत. गुरुवारी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली होती. त्यात, सुधारित याचिका सादर करण्यासाठी पायलट गटाच्या वतीने साळवे यांनी वेळ मागून घेतला होता.

राजस्थान काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकांना सचिन पायलट यांच्यासह त्यांचे 18 समर्थक आमदार गैरहजर राहिले. त्यांचे हे कृत्य पक्षविरोधी मानून पायलट यांच्यासह 18 आमदारांना विधानसभा अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी अपात्र ठरवण्याची नोटीस बजावली. त्याला पायलट गटाने राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिले आणि काँग्रेस सदस्य म्हणून मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे.

भाजपमध्ये जाणार नाही- पायलट

राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आल्यानंतर सचिन पायलट यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचं म्हटलं होतं. सचिन पायलट म्हणाले होते की, मी भाजपमध्ये जाणार नाही, मी माझी रणनीति तयार करत आहे. काही लोकांनी मी भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या असल्याचं पायलट म्हणाले होते.

दरम्यान राजस्थान विधानसभा अध्यक्षांकडून सचिन पायलट यांच्यासह 19 आमदारांना नोटिस पाठवण्यात आली आहे. त्यात आज, 17 जुलैपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करण्याचं सांगितलं आहे. पायलट यांच्यासह 19 आमदारांना विधानसभा सदस्यता रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसकडून नोटिस पाठवली आहे. दोन दिवसात या नोटिशीला उत्तर देण्याबाबत सांगितलं होतं. सूत्रांच्या माहितीनुसार पायलट नवीन पक्षाची स्थापना देखील करु शकतात.

'भाजपमध्ये जाणार नाही, काही लोकांनी अफवा पसरवली' : सचिन पायलट

सचिन पायलट यांना हटवल्यानंतर राजीनामास्त्र
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष पदावरुन हटवल्यानंतर एनएसयूआय प्रदेश अध्यक्ष अभिमन्यु पूनिया यांनी राजीनामा दिला. तसेच टोंकमध्ये लक्ष्मण सिंह गाता यांच्यासह 59 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. पाली जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चुन्नीलाल चादवास यांनीही राजीनामा दिला आहे.

सचिन पायलट यांच्यावर अखेर कारवाई, राजस्थानचं कुठल्या वळणावर जाणार राजकारण

सचिन पायलट यांचं ट्वीट

पायलट यांनी ट्वीट करत त्यांना पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले आहेत. "मला ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे मी आभार मानतो. राम राम सा. सत्य परेशान होऊ शकत मात्र पराजित नोही होऊ शकत, असं पायलट यांनी म्हटलं होतं.