Coronavirusजगभरातील कोरोनाचा कहर सुरुच आहे. जगभरात कोरोनाचे एक कोटी 39 लाखांहून अधिक रुग्ण झाले आहेत. जगभरात मागील 24 तासात 2.47 लाख नवीन कोरोना केस समोर आल्या आहेत, तर 5,714 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात देखील कोरोनाचा कहर वाढला आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या 10 लाखांच्या वर गेली आहे. मागील 24 तासात 32 हजारांहून अधिक रुग्ण भारतात कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार जगभरात जीवघेण्या कोरोना व्हायरसची लागण एक कोटी 39 लाख लोकांना झाली असून आतापर्यंत मृत्यूंची संख्या 5 लाख 92 हजारांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे जगभरात 82 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. एक दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमणाच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.


भारतात कोविडचे 1,005,637 रुग्ण


वर्डोमीटरच्या आकडेवारीनुसार रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. भारतात कोविडचे 1,005,637 रुग्ण आहेत. तर 25,609 बळी कोरोनामुळं गेले आहेत. सध्या भारतात 343,426 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 636,602 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. भारतात मागील 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक 32 हजारांहून अधिक नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत.


अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाख 28 हजारांवर


जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. अमेरिकेत 3,693,700 जणांना कोरोनाचा संसर्ग झालाय. तर 141,095 लोकांचा मृत्यू कोरोनामुळं झालाय. अमेरिकेनंतर ब्राझीलमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. ब्राझीलमध्ये 2,014,738 कोरोनाबाधित आहेत तर 76,822 लोकांचा मृत्यू झालाय. त्यानंतर  यूकेत 45,119 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. तर तिथं कोरोनाबाधितांची संख्या 292,552 इतकी आहे.


कोणत्या देशात किती कोरोनाबाधित




  • अमेरिका:          कोरोनाबाधित - 3,693,700, मृत्यू - 141,095

  • ब्राझिल:              कोरोनाबाधित - 2,014,738, मृत्यू - 76,822

  • भारत:                कोरोनाबाधित - 1,005,637, मृत्यू - 25,609

  • रशिया:                  कोरोनाबाधित - 752,797, मृत्यू - 11,937

  • पेरू:                  कोरोनाबाधित - 341,586, मृत्यू - 12,615

  • साऊथ आफ्रिकाः कोरोनाबाधित - 324,221, मृत्यू - 4,669

  • चिली:                कोरोनाबाधित - 323,698, मृत्यू - 7,290

  • मॅक्सिको:          कोरोनाबाधित - 317,635, मृत्यू - 36,906

  • स्पेन:                  कोरोनाबाधित - 305,935, मृत्यू - 28,416

  • यूके:                  कोरोनाबाधित - 292,552, मृत्यू - 45,119


16 देशांमध्ये प्रत्येकी दोन लाखांहून अधिक कोरोनाबाधित
अमेरिका, स्पेन, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत, पेरु, इटली,इराण,मॅक्सिको, पाकिस्तान, टर्की, साऊथ अरब, साउथ आफ्रिका आणि जर्मनी हे 16 देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा दोन लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिकेत एक लाखांहून अधिक बळी गेले आहेत. यूके, ब्राझील या देशांमध्ये 40 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे.