Rain News : देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे. कुठं गारठा वाढला आहे, तर कुठं पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. भारतीय हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासात तामिळनाडूतील (Tamil Nadu) काही जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. यामध्ये दक्षिण तामिळनाडूमध्ये पावसाचं थैमान पाहायला मिळत आहेत. दक्षिण तामिळनाडूच्या थुथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यात मागील 24 तासांत 400 ते 950  मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. 
 
मागील 24 तासात कयालपट्टीणममध्ये 946 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सोबतच केरळमध्ये (Kerala) देखील पावसाचं धुमशान पाहायला मिळत आहे. मागील 24 तासात केरळमधील अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे. आज देखील भारतीय हवामान विभागानं  केरळसह तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 




राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू


डोंगराळ भागात बर्फवृष्टी (Snowfall) झाल्यानंतर मैदानी भागात थंडी वाढली आहे. राजधानी दिल्लीत कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. पहाटेपासूनच येथे धुके दिसून येते. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार लडाख, हिमाचल प्रदेश आणि मुझफ्फराबादमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच, हिमाचल प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


हिमाचलमध्ये बर्फवृष्टी, दिल्लीत कडाक्याची थंडी; 'या' राज्यांमध्ये पावसाचा इशारा