PM Modi Interacts With Specially Abled Person In Varanasi: वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) त्यांचा संसदीय मतदारसंघ वाराणसीच्या (Varanasi) दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. 19 हजार कोटींहून अधिक किमतींचे 37 प्रकल्प इथल्या लोकांना भेट देण्यासाठी पंतप्रधान आले आहेत. रविवारी, दौऱ्याच्या पहिल्या दिवशी, पीएम मोदींनी (PM Modi) नमो घाट येथे काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या सत्राचं उद्घाटन केलं. याशिवाय वाराणसीहून कन्याकुमारीकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसलाही  हिरवा झेंडा दाखवला.


यानंतर पंतप्रधान मोदींनी नाडेसर भागातील कटिंग मेमोरियल स्कूलमध्ये विकास भारत संकल्प यात्रेला संबोधित केलं आणि सरकारी योजनांची 100 टक्के व्याप्ती साध्य करण्याच्या गरजेवर भर दिला. येथील मेमोरियल स्कूलच्या मैदानात विकास भारत यात्रेअंतर्गत उभारलेल्या स्टॉलवर पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काही दिव्यांगांशी संवादही साधला. सध्या मोदींनी दिव्यांगांशी साधलेल्या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, यावेळी मोदींचा मिश्किल अंदाज पाहायला मिळाला. 


मोदींचा मिश्किल अंदाज, तरुणाची भंबेरी 


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पीएम मोदी एका दिव्यांग व्यक्तीकडून त्याचं शिक्षण, कमाई आणि योजनांमधून होणाऱ्या लाभासंबंधी प्रश्न विचारत आहेत. तरुणही सर्व प्रश्नांची उत्तरं देतो. पण, जेव्हा पंतप्रधान मोदी त्याच्या उत्पन्नाशी संबंधित प्रश्न विचारतात, तेव्हा तो संकोचतो दबक्या आवाजात उत्तर देतो. पण तेवढ्या मोदी मिश्किल अंदाजात त्याला असं काही उत्तर देतात की, एकच हशा पिकतो. मोदी त्याला म्हणतात, "ठिक आहे नका सांगू, तुम्हाला वाटेल की, मोदी आयकर विभागाला पाठवतील."






व्हायरल व्हिडीओमध्ये मोदी काय म्हणतायत? 


पंतप्रधान मोदी : शिक्षण किती झालंय? 


तरुण : M.com पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. आता सिव्हिल सर्विसेसची तयारी करतोय. 


पंतप्रधान मोदी : इथे तुम्हाला कोणकोणत्या योजनांचा फायदा मिळालाय? 


तरुण : इथे पेन्शन मिळालीय आणि दुकान चालवण्यासाठीही अर्ज केला आहे. 


पंतप्रधान मोदी : कसलं दुकान चालवणार आहे? 


तरुण : सीएचसी सेंटर चाललतोय. त्यातच स्टेशनरीही टाकणार आहे. 


पंतप्रधान मोदी : किती लोक येतात सीएचसी सेंटरवर? 


तरुण : तसे मोजले नाहीत, पण 10 ते 12 जण येतात. 


पंतप्रधान मोदी : महिन्याला किती कमाई होते? (मोदींना हा प्रश्न विचारताच तरुण संकोचला आणि दबक्या आवाजात म्हणाला, तसा हिशोब ठेवलेला नाही.)


पंतप्रधान मोदी : अरे नका सांगू, इन्कम टॅक्स वाले नाही येणार. नाहीतर तुम्हाला वाटेल मोदी इन्कम टॅक्स वाल्यांना पाठवेल म्हणून. 


पंतप्रधानांकडून मुलीसोबतच्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर 


पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये एका मुलीशी संवाद साधला होता. पीएम मोदींनी हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला असून 'My friend in Varanasi knows her science well and is also a great poet', असं कॅप्शन दिलं आहे. मुलीनं फोटोवर बनवलेल्या झाडे आणि रोपांच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींना कविता ऐकवली. यावेळी पंतप्रधानांनी तिला विचारलं की, तू सर्व भाज्या खातेस का? यावर मुलीनं उत्तर दिलं, "हो", मग पीएम म्हणाले की, "एकतरी अशी भाजी असेल, जी तू खात नाहीस. किंवा घरी अशी भाजी बनत असेल जी तुला आवडत नाही."


यावर मुलीनं उत्तर दिलं की, "कारलंठ. या उत्तरावर पीएम मोदी हसले. यानंतर ती मुलगी त्यांना म्हणाली, "सर, जर तुम्ही परवानगी दिली तर मी तुम्हाला एक कविता ऐकवू? यावर पंतप्रधान म्हणाले, "तुम्ही कवी आहात का? यानंतर मुलीनं पंतप्रधान मोदींवर लिहिलेली कविता ऐकवली.