Railway minister Ashwini Vaishnaw : एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये देशात दर महिन्याला सरासरी 15 ते 16 लाख नोकऱ्यांसाठी नोंदणी करण्यात आल्याचं PFची आकडेवारी सांगते असं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधील अजमेरमध्ये सीआरपीएफने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली.


केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, "जेव्हा एखादी व्यक्ती संघटित कामात गुंतते तेव्हा त्यांची पीएफसाठी नोंदणी केली जाते. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये देशात दर महिन्याला सरासरी 15 ते 16 लाख नोंदण्या करण्यात आल्या. EPFO आणि सांख्यिकी मंत्रालयाच्या वेबसाइट्सवर हा डेटा उपलब्ध आहे."






संपूर्ण जगात आर्थिक संकटाची परिस्थिती


वैष्णव म्हणाले की, संपूर्ण जगात आर्थिक संकटाची परिस्थिती आहे. अशा परिस्थितीतही भारत हा एक ऊर्जास्रोत म्हणून उदयास आला आहे. मोदी सरकारच्या योजनांमुळे प्रत्येक वर्गाचे जीवन सोपे झाले आहे, असे ते म्हणाले.


तरुणांना दिला मंत्र
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तरुणांना 'नेशन फर्स्ट, ऑलवेज फर्स्ट' हा मंत्र अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, जीवनात त्यांनाच विजय मिळतो. ज्या लोकांनी नेहमीच आपल्या कर्तव्यात राष्ट्राला प्रथम स्थान दिले आहे. तरुणांसमोरील आव्हानांचा संदर्भ देत वैष्णव म्हणाले की, जर तरुणांनी एकच गोष्ट, एक मंत्र लक्षात ठेवला तर त्यांच्या मनात कधीही शंका येणार नाही. यावेळी रोजगार मेळाव्यात नोकरी मिळालेल्या अनेकांना नियुक्ती पत्रांचे वाटपही करण्यात आले.






71 हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वाटप
 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून 71,000 हून अधिक तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्रे वितरित केली आहेत. मोदी म्हणाले होते की, गेल्या एका महिन्यात विविध प्रदेशांमध्ये अशाच प्रकारच्या मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 71,056 भरतींसाठी नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेश जिथे आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे ही राज्ये वगळता, देशभरात 45 ठिकाणी नुकत्याच झालेल्या केंद्र सरकारच्या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.