नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांनी दिल्लीतील बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यांनंतर पीडितेच्या कुटुंबियांचा फोटो ट्वीट करत ओळख जाहीर केली होती. त्यानंतर ट्विटरने या संदर्भातील स्पष्टीकरण राहुल गांधीकडे मागितले होते. सहा दिवसांपूर्वी राहुल गांधीनी ट्वीट केले होते. अकाऊंट सस्पेंड झाल्यानंतर राहुल गांधी इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत.  


यानंतर आता कॉंग्रेसच्या अधिकृत अकाऊंटवरून  ट्वीट करत या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. ट्वीटमध्ये कॉंग्रेसने म्हटले आहे की, "राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हे तात्पुरते सस्पेंड करण्यात आले आहे. राहुल गांधी इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय राहतील.. . जय हिंद."






राहुल गांधी यांनी पीडितेच्या आई-वडिलांचा फोटो ट्वीट केला होता. त्याला भाजपकडूनही आक्षेप घेण्यात आला होता.  त्यानंतर ट्विटरनं राहुल गांधी यांचं ते ट्वीट हटवलं होतं. तरी त्यांचं ट्विटर अकाऊंट तात्त्पुरतं सस्पेंड करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने ट्विटर आणि  दिल्ली पोलिसांना पत्र  पाठवत या संदर्भात कारवाई करण्यास सांगितले होते.