नवी दिल्ली : पंजाबच्या होशियारपूर येथे झालेल्या बलात्काराच्या घटनेसंदर्भात भाजपने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलं आहे. राहुल गांधी यांनी हाथरस हा हॅशटॅग वापरुन ट्विट केले आहे की, यूपीप्रमाणे पंजाब आणि राजस्थान मधील सरकारं मुलीवर बलात्कार झाल्याचं नाकारत नाही, त्यांनी कुटुंबाला धमकावलं ​​नाही आणि न्यायाच्या मार्गात अडथळाही आणत नाहीत. जर त्यांनी तसे केले तर मी न्यायासाठी लढायला तिथंही जाईन.


पंजाबच्या होशियारपूरमध्ये अत्याचारात सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याला तीन दिवस झाले आहेत. या घटनेवरुन भाजप सातत्याने काँग्रेस नेते राहुल गांधींकडे विचारना करत आहेत. जेव्हा हाथरसमध्ये बलात्कार आणि हत्याकांड झालं त्यावेळी राहुल गांधी राजकारण करण्यासाठी तिथं गेलं होतं. मात्र, काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये ही घटना घडल्यानंतर मात्र राहुल गांधी गप्प का? असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.





पंजाबमधील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राहुल गांधी गप्प का? : निर्मला सीतारमण


यापूर्वी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हाथरस येथे आंदोलन करणारे राहुल गांधी होशियारपूरला का जात नाहीत, असा सवाल केला. इतकी भयानक घटना घडलेली असताना राहुल गांधी तेजस्वी यादव सोबत बिहारमध्ये प्रचार करत आहेत.


पंजाबमधील टांडा शहरात एका प्रवासी मजुराच्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाला जाळून टाकले. आरोपीच्या घरी मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला. ही घटना गुरुवारीची आहे. या घटनेत सहभागी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत मुलीचे वडील एका हवेलीमध्ये काम करतात. या हवेली मालकाच्या नातवावर हा असत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आजोबा आणि नातू दोघांनाही अटक केली आहे.