नवी दिल्ली : पंजाबच्या होशियारपूरमध्ये अत्याचारात सहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याला तीन दिवस झाले आहेत. या घटनेवरुन भाजप सातत्याने काँग्रेस नेते राहुल गांधींकडे विचारना करत आहेत. जेव्हा हाथरसमध्ये बलात्कार आणि हत्याकांड झालं त्यावेळी राहुल गांधी राजकारण करण्यासाठी तिथं गेलं होतं. मात्र, काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये ही घटना घडल्यानंतर मात्र राहुल गांधी गप्प का? असा प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.


अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, मला काँग्रेस पक्षाला विचारायचंय, जिथं तुमचं सरकार नसेल तिथं बलात्कार झाला तर तुम्ही भाऊ-बहिणींसोबत गाडीत जाऊन पिकनिकसारखं प्रदर्शन करता, होशियापूरमध्ये अशीचं घटना घडल्यानंतर मात्र काँग्रेस गप्प आहे? कारण तिथं काँग्रेसचं सरकार आहे म्हणून? प्रत्येक विषयावर ट्विट करणारे राहुल गांधी यांनी होशियारपूर येथील घटनेबद्दल एक अवाक्षरही काढला नाही. या घटनेला आता तीन दिवस झालेत.


हाथरस प्रकरण : अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात आज सुनावणी; पीडित कुटुंबिय रवाना


सीतारमण म्हणाल्या, की "काल, राहुल गांधींनी बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्यासमवेत प्रचार केला. पण पंजाबमधील मुलीवर झालेल्या अत्याचाराबद्दल हे दोन्ही नेते एक शब्द बोलू शकले नाही. राजस्थानात किंवा अन्य राज्यात जिथे काँग्रेस सरकार असेल तर तिथे त्यांना बलात्कार झाला तरी त्यांना दिसत नाही. "


राहुल गांधी होशियारपूरला का जात नाहीत? : प्रकाश जावडेकर


तत्पूर्वी माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हाथरस येथे आंदोलन करणारे राहुल गांधी होशियारपूरला का जात नाहीत, असा सवाल केला. इतकी भयानक घटना घडलेली असताना राहुल गांधी तेजस्वी यादव सोबत बिहारमध्ये प्रचार करत आहेत.


6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार, नंतर जाळून खून
पंजाबमधील टांडा शहरात एका प्रवासी मजुराच्या सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाला जाळून टाकले. आरोपीच्या घरी मुलीचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला. ही घटना गुरुवारीची आहे.


या घटनेत सहभागी आरोपींना अटक करण्यात आली आहे. मृत मुलीचे वडील एका हवेलीमध्ये काम करतात. या हवेली मालकाच्या नातवावर हा असत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आजोबा आणि नातू दोघांनाही अटक केली आहे.