नवी दिल्ली : कर विवरणपत्र भरण्याची तारीख एक महिन्याने वाढविण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे की वैयक्तिक करदात्यांसाठी आयकर रिटर्न (आयटीआर) 2019-20 या आर्थिक वर्षासाठी भरण्याची अंतिम मुदत एक महिन्याने वाढवून 31 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे.


मंत्रालयाने म्हटले आहे की ज्या करदात्यांचे खाते ऑडिट करणे आवश्यक आहे, त्यांच्यासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत दोन महिन्यांनी वाढवून 31 जानेवारी 2021 करण्यात आली आहे.


यापूर्वी सरकारने मे महिन्यातही करदात्यांना 2019-20 वित्तीय वर्षात आयटीआर भरण्याची मुदत 31 जुलै ते 30 नोव्हेंबर या कालावधीत वाढवून सवलत दिली होती.


जियोकडून 5G तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी; भारतात लवकरच होणार लॉन्च


केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) एका निवेदनात म्हटले आहे की, "ज्या करदात्यांकरिता आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2020 होती, त्यांची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे."


त्याचप्रमाणे, ज्या करदात्यांचे अकाउंट ऑडिट करणे आवश्यक आहे आणि ज्यांची पूर्वीची मुदत 31 ऑक्टोबर 2020 होती, ते आता 31 जानेवारी 2021 पर्यंत आयटीआर भरू शकतात. करदात्यांना आयटीआर भरण्यासाठी अधिक मुदत देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असल्याचे सीबीडीटीने सांगितले.


Reliance Jio 5G | जिओकडून 5 जी मोबाईल नेटवर्कची यशस्वी चाचणी