New Parliament Building: नव्या संसद भवनाचं उद्घाटन रविवारी (28 मे) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केलं. संसद भवनाच्या उद्घाटनानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तसेच राहुल गांधींनी जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना देखील समर्थन दिले आहे. 'राज्याभिषेक आता पूर्ण झाला असून अंहकारी राजा रस्त्यावर जनेताचा आवाज दाबत आहे' अशी टीका राहुल गांधी यांनी
नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरुन गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि विरोधी पक्षामध्ये घमासान सुरु आहे. खरंतर विरोधी पक्षाला नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधानांनी नाही तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावं असं वाटत होतं. त्यामुळे या नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाला चांगलाच विरोध करण्यात येत होता. मात्र भाजपाने पंतप्रधान मोदीच या नव्या संसदेचं उद्घाटन करणार असल्याचं निश्चित केलं. तसेच या ट्वीटमध्ये राहुल गांधी यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. 'संसद ही लोकांचा आवाज आहे, पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत.' अशी टीका देखील राहुल गांधी यांनी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
देशातील 19 विरोधी पक्ष उद्घाटन सोहळ्यापासून दूर
विरोधातील एकूण 19 विरोधी पक्ष या उद्घाटनाच्या सोहळ्याला गैरहजर होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील या उद्घाटन सोहळ्याला अनुपस्थित होते. 'मी या सोहळ्याला गेलो नाही याचं मला समाधान वाटतं', अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे इतर अनेक पक्षातील दिग्गज नेत्यांनी या सोहळ्याला अनुपस्थिती दर्शवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले नव्या संसदेचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (28 मे) रोजी संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले. सर्वात आधी पंतप्रधानांनी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ राजदंडाची स्थापना केली. तसेच संसदेच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला संबोधित देखील केले. त्यावेळी त्यांनी म्हटले की, 'ही इमारत 140 कोटी भारतीय जनतेच्या आकांक्षाचे आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. आज संपूर्ण भारत याकडे आदराने आणि आशेने बघत आहे.' पुढे बोलतांना पंतप्रधानांनी म्हटले की, ' जेव्हा भारत पुढे जातो तेव्हा जग पुढे जाते. काही वेळेस देशाच्या विकासाचा प्रवास हा अमर होऊन जातो आणि आज तो क्षण आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Wrestlers Protest : दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार गोंधळ; साक्षी मलिकसह कुस्तीपटू ताब्यात