ABP C-Voters: देशात आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांकडून भाजपविरोधात (BJP) रणनीती आखण्यात येत आहे. एकामागून एक विरोधी पक्षांचे नेते अनेक भाजपच्या नेत्यांना सत्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता राहुल गांधी हे पंतप्रधानांच्या शर्यतीत कुठे आहेत हा प्रश्न निर्माण होता आहे. 


एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने (C-VOTER) मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये पंतप्रधान पदासाठी लोकांनी कोणाला पसंती दर्शवली आहे? देशातील महत्त्वाच्या आणि मोठ्या समस्या कोणत्या? पंतप्रधानांच्या शर्यतीत राहुल गांधी मागे आहेत की पुढे? या आशयाचे प्रश्न विचारण्यात आले होते. 


जाणून घेऊया जनतेचा कौल


पंतप्रधान पदासाठी कोणाला पसंती? 
स्रोत- सी वोटर
पंतप्रधान नरेंद्र मोदी - 49 टक्के
राहुल गांधी -18  टक्के
नीतिश कुमार -1 टक्के
योगी आदीत्यानाथ - 6 टक्के
ममता बॅनर्जी - 2 टक्के
 अरविंद केजरीवाल- 5 टक्के
इतर - 19 टक्के आणि कमी 


पंतप्रधान नरेंद्र मोदी की राहुल गांधी पंतप्रधान पदासाठी कोणाला पसंती?


स्रोत- सी वोटर
पंतप्रधान नरेंद्र मोदी - 56 टक्के
राहुल गांधी - 35  टक्के
दोन्ही नाही - 5  टक्के
माहित नाही - 4 टक्के


सध्या देशातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता?


स्रोत- सी वोटर
बेरोजगारी - 28 टक्के 
महागाई - 22 टक्के 
भ्रष्टाचार - 6 टक्के 
गरिबी - 7 टक्के 
विकास - 6 टक्के 
माहित नाही - 7 टक्के 
इतर - 24 टक्के 


केंद्र सरकारच्या कामावर जनता समाधानी आहे का हा शेवटचा प्रश्न होता


स्रोत- सी वोटर
खुश - 71 टक्के 
नाखुश - 27 टक्के 
माहित नाही - 2 टक्के 


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा लोकसभा निवडणूकीसंदर्भात मोठा दावा


गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आसामच्या एक दिवसीय दौऱ्यावर होते. त्यावेळी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे सलग तिसरे पंतप्रधान होतील आणि काँग्रेसकडे सध्या असलेल्या जागा देखील आगामी निवडणुकांमध्ये गमावण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे' असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार शाह यांनी म्हटलं की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये  300 पेक्षा अधिक जागांनी निवडून येऊन पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. तसेच काँग्रेसने विरोधी पक्षाचा दर्जा देखील घालवला आहे आणि लोकसभेमध्ये सध्या त्यांच्याकडे ज्या जागा आहेत त्यासुद्धा काँग्रेस आगामी निवडणुकांमध्ये मिळवू शकणार नाही' त्यामुळे आता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये जनता कोणला कौल देते आणि पंतप्रधान पदाचा कोण दावेदार असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


महात्मा गांधींना अभिवादन, राजदंडाला साष्टांग दंडवत; नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया