नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. आज पंजाब व हरियाणातले शेतकरी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत मोर्चा काढणार असल्याने पोलीसांनी दिल्लीच्या सीमा बंदिस्त केल्या आहेत. यावर कॉंग्रेसनेते राहुल गांधी यांनी एका कवितेच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की मोदी सरकारच्या क्रूरतेच्या विरोधात देशातील शेतकरी उभा आहे.


देशातील विविध भागातील शेतकरी नव्या कृषी कायद्यात बदल करावा असे वारंवार केंद्र सरकारला सांगत आहेत. त्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने झाली आहेत. आज पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीत जाऊन या कायद्याविरोधात मोर्चा काढणार होते. पण दिल्लीच्या सीमांवर प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करुन शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच आडवण्यात आलं आहे. या मुद्द्यावरुन आता कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.


शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राहुल गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यात त्यांनी एका कवितेचा संदर्भ दिला आहे. तसेच राहुल गांधींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात असं दिसतंय की कृषी कायद्याविरोधात मोठ्या संख्येने शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला त्यांना रोखण्यासाठी प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. थंडीच्या या दिवसांत शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सुरक्षा बलांकडून पाण्याच्या फवाऱ्याचा वापर केला जातोय.





केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला देशभरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचे आज दिल्लीत मोर्चा काढण्याचे नियोजन होतं. शेतकऱ्यांच्या या मोर्चाला रोखण्यासाठी पोलीसांनी दिल्लीच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. हरियाणातील अंबाला येथे शेतकरी आणि पोलीसांत झटापट झाली. त्यादरम्यान पोलीसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा आणि अश्रू गॅसचा वापर केला.


पहा व्हिडिओ: Kisan Morcha : सरकार चर्चेऐवजी दबावतंत्राचा वापर करतेय : योगेंद्र यादव



महत्वाच्या बातम्या: