Bajaj Group : राहुल बजाज (Rahul Bajaj) यांच्या कुटुंबाला स्वातंत्र्यलढ्याची पाश्वर्भूमी आहे. त्यांचे आजोबा जमनालाल बजाज हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचाच आदर्श कायम ठेवत राहुल बजाज यांनी कोरोनाकाळात आरोग्यसुविधा पुरविण्यासाठी देशाला 100 कोटी रुपयांची मदत केली होती. 


दोन वर्षापूर्वी कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीला अनेक लोक आपापल्या गावी परतत होते. अशा बेघर, रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना राहुल बजाज यांनी या 100 कोटींच्या निधीद्वारे मदत केली. या लोकांना अन्नधान्य पुरवठा केला गेला. त्यांच्या आरोग्य आणि स्वच्छतेकचे विशेष लक्ष दिले गेले. गरजूं लोकांना मदत केली गेली. 


राहुल बजाज यांनी कोरोनाकाळात देशाला 100 कोटींचा निधी दिल्यानंतर शरद पवारांनीदेखील त्यांच्या या कृतीचं कौतुक केलं होतं.





राहुल बजाज यांच्या निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया
ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, "पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने आपल्याला धक्का बसला आहे. स्वातंत्र्यसैनिक जमनालाल बजाज यांच्या या नातवाने समाजामध्ये विशेषत: गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांच्या जीवनात बजाज टू व्हीलरच्या माध्यमातून एक मोठी बदल घडवून आणला. याच 'हमारा बजाज'ने समाजामध्ये एक मोठा सामाजिक आणि आर्थिक बदल घडवून आणला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्व भारतीय त्यांच्या ऋणामध्ये राहतील. माझ्या जवळच्या मित्राच्या निधनाने आपल्याला दु:ख झालं आहे. भारताने एक उद्योगपती, मानवतावादी आणि तरुण उद्योगपतींसाठी असलेला मार्गदर्शक गमावला. हमारा बजाज".


संबंधित बातम्या


Rahul Bajaj Passes Away : 7 विद्यापीठांकडून डॉक्टरेट, भारत सरकारकडून पद्मभूषण, राहुल बजाज यांना मिळालेत अनेक पुरस्कार


Rahul Bajaj Passes Away: 'हमारा बजाज' हरपला, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन


Rahul Bajaj: भारताने उद्योगपती, दीपस्तंभ अन् 'हमारा बजाज' गमावला; राहुल बजाज यांच्या निधनावर शरद पवारांची प्रतिक्रिया


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha