Rahul Bajaj Death : देशातील प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे प्रमुख राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचं शनिवारी पुण्यात निधन झालं आहे. ते 83 वर्षांचे होते.  भारतातील सर्वात यशस्वी उद्योगपतींमध्ये राहुल बजाज यांचे नाव घेतले जाते. राहुल बजाज यांना आयआयटी रुरकीसह सात विद्यापीठांनी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केलं आहे.


'या' पुरस्कारांनी केले सन्मानित 
- आर्थिक आणि व्यावसायिक क्षेत्रात राहुल बजाज यांनी अमूल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
- 2001 मध्ये राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
- हार्वर्ड बिझनेस स्कूलकडून 'माजी विद्यार्थी'चा विशेष पुरस्कारदेखील त्यांना मिळाला आहे.  
- फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी 'नाइट इन द ऑर्डर ऑफ द लीजन ऑफ ऑनर' म्हणून  नियुक्ती केली होती. 
- तसेच भारत सरकारने राहुल बजाज यांची 1975 ते 1977 या कालावधीत ऑटोमोबाईल्स अँड अलाईड इंडस्ट्रीज विकास परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
- सन 1975 मध्ये 'राष्ट्रीय गुणवत्ता हमी' या संस्थेने 'मॅन ऑफ द इयर' या पुरस्काराने 
राहुल बजाज यांना सन्मानित करण्यात आले होते. 
- 1990 मध्ये राहुल बजाज यांना 'बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन'च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 
- 'प्रिन्स ऑफ वेल्स'ने राहुल बजाज यांना फेब्रुवारी 1992 मध्ये 'प्रिन्स ऑफ वेल्स इंटरनॅशनल बिझनेस लीडर्स फोरम'चे सदस्य बनवले होते. 
- 1996 मध्ये एफआयई फाऊंडेशनने राहुल बजाज यांना राष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले होते. 
- 2000 साली राहुल बजाज यांना लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्टने टिळक पुरस्काराने सन्मानित केले होते.


संबंधित बातम्या 


Rahul Bajaj Passes Away: 'हमारा बजाज' हरपला, बजाज उद्योग समूहाचे प्रमुख राहुल बजाज यांचं निधन


Rahul Bajaj Death: स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या उद्योगपतीचे वारसदार होते राहुल बजाज... 


Rahul Bajaj Passes Away : समाजाबद्दल कणव असलेला उद्योजक काळाच्या पडद्याआड ; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहुल बजाज यांना श्रद्धांजली


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha