Rabindranath Tagore Death Anniversary : भारताचं राष्ट्रगीत 'जन गण मन' याची रचना ज्यांनी केली असे महान कवी म्हणजेच रवींद्रनाथ टागोर (Rabindranath Tagore) यांची आज पुण्यतिथी आहे. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी आणि संगीतकार म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचा नावलौकिक होता. तसेच नोबेल पुरस्कार मिळवणारे आशिया खंडातील ते पहिले नागरिक होते. त्यांनी लिहिलेल्या 'गीतांजली' या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कारकिर्दीबद्दल जाणून घेऊयात.
- रवींद्रनाथ टागोर यांचा जन्म 7 मे 1861 रोजी बंगालमधील जोजासांको या ठिकाणी झाला. रवींद्रनाथ टागोरांनी भारताचं राष्ट्रगीत 'जन गण मन' आणि बांग्लादेशचं राष्ट्रगीत 'आमार शोनार बांग्ला'ची निर्मिती केली. त्यांनी कला, साहित्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं.
- रवींद्रनाथ यांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या.
- ब्रिटीश सरकारकडून त्यांना सर हा किताब दिला होता. पण जालियानवाला बाग हत्याकंडामुळे त्यांनी हा किताब सरकारला परत दिला होता.
- 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्य आणि संगीतात आमूलाग्र बदल घडून आला. 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जिंकणारे जगातील पहिले गैर-युरोपियन आणि साहित्यातील पहिले गीतकार होते.
- एक मानवतावादी, सार्वभौमवादी, आंतरराष्ट्रीयवादी म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा विरोध केला. शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत आणि उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती आणि रवीन्द्रसंगीताचे सृजन हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होते.
- संत तुकारामांच्या साहित्याचा त्यांनी अभ्यास केला होता. संत तुकारामांचे काही अभंग त्यांनी बंगाली भाषेत अनुवादित केले आहेत. संगीत, साहित्य, तत्त्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रवींद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रवींद्रनाथांची निर्मिती खरी उतरते.
- महात्मा गांधी यांना रवींद्रनाथ टागोरांच्याबद्दल प्रचंड आदर होता. त्यांनीच टागोर यांना गुरूदेव अशी उपाधी दिली. रविंद्रनाथ टागोर यांनी 7 ऑगस्ट 1947 साली कोलकात्यात अखेरचा श्वास घेतला.
शास्त्रीय संगीतात योगदान :
रवींद्रनाथ टागोर यांनी साहित्यामध्ये दोन हजारांहून अधिक रचना केल्या आहेत. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात आपलं योगदान दिलं. यापैकी 'संध्यासंगीत' हा कविता संग्रह लिहिला. तसेच प्रभात संगीत, शैशवसंगीत, छबि ओ गान अशी संगीताशी नाती सांगणारी काव्यसंग्रह आहेत. पोस्टमास्टर, चित्रा, नदी, चैताली, विदाई अभिशाप, चिरकुमार सभा, काबुलीवाला अशा अनेक साहित्यांची निर्मिती त्यांनी केली. 'जेव्हा आपण विनम्र असतो त्यावेळी आपण महानतेकडे प्रवास करत असतो' असे ते म्हणायचे.
महत्त्वाच्या बातम्या :