Pushkar Mela: राजस्थानमधील (Rajasthan) अजमेर (Ajmer) जिल्ह्यातील पुष्कर येथे आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळा (Pushkar Mela) भरला आहे. या मेळ्यात एका म्हशीनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आहे. या म्हशीची किंमत एकूण तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. या म्हशीची किंमत तब्बल 11 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. ही म्हैस सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र बनली आहे. 'अनमोल' असं या म्हशीचं नाव (Anmol buffalo) आहे. म्हशीच्या मालकानं दिलेल्या माहितीनुसार,  तिच्या देखभालीवर दरमहा अडीच ते तीन लाख रुपये खर्च करतो


मुर्रा जातीच्या अनमोलचे 1570 किलो वजन


दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळ्यात कोटयवधींच्या म्हशीं विक्री होतेय. पण या जत्रेतील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे म्हैस अनमोल. हरियाणा (सिरसा) येथून आलेल्या या म्हशीच्या मालकाने तिची किंमत 11 कोटी रुपये ठेवली आहे. अनमोलची देखभाल करण्यावर दरमहा मालकाचा अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो असा दावा करण्यात आला आहे. अनमोल म्हैस ही 5.8 फूट उंच आणि मुर्रा जातीची आहे. अनमोलचे वजन हे सुमारे 1570 किलो आहे. गेल्या वर्षी अनमोलचे वजन 1400 किलो होते. 


म्हशीला खायला एक किलो तूप, काजू-बदाम आणि चणे 


अनमोलचा आहार आणि इतर खर्च मिळून प्रत्येक महिन्याला 2.50 ते 3 लाख रुपये खर्च होत असल्याचा दावा मालक हरविंदर यांनी केला आहे. म्हशीला दररोज एक किलो तूप, पाच लिटर दूध, एक किलो काजू-बदाम, चणे आणि सोयाबीन दिले जाते. दोन लोक नेहमी या म्हशीसोबत राहतात, ज्यासाठी त्यांना वेगळा पगार दिला जातो. गेल्या वर्षी अनमोल आणली तेव्हा तिची किंमत अंदाजे 2.30 कोटी रुपये होती. पण, विक्री करण्यास नकार दिला. यावेळी अनमोलची किंमत 11 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे.


मुर्रा जातीच्या म्हशीला जास्त मागणी


मुर्रा जातीची म्हैस ही तिची शिंगे आणि आकारावरुन ओळखली  जाते. हरविंदरने दिलेल्या माहितीनुसार, अनमोलला होणारी रेडके हा चांगल्या स्थितीत असतात. मुख्यतः अनमोलचा वापर हा रेडकांच्या प्रजननासाठी केला जातो. दरम्यान, मुर्रा जातीच्या म्हशीला जास्त मागणी आहे.  हरविंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणाच्या झज्जर मेळ्यात ही म्हैस चॅम्पियन ठरली आहे. 


पुष्कर जत्रेचे महत्त्व 


सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेवाने कार्तिक महिन्याच्या एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस पुष्करमध्ये यज्ञ केला होता असे मानले जाते. या काळात पृथ्वीवर 33 कोटी देवी-देवतांची उपस्थिती होती. त्यामुळं कार्तिक महिन्यातील एकादशी ते पौर्णिमा या पाच दिवसांचे पुष्करमध्ये विशेष महत्त्व आहे. असे म्हणतात की या महिन्यात सर्व देवता पुष्करमध्ये वास करतात. या समजुतींमुळं पुष्कर जत्रेचे आयोजन केले जाते. प्राचीन काळी साधनसामग्रीच्या कमतरतेमुळं भाविक जनावरे सोबत आणत असत. त्यानंतर हळूहळू गुरांचा मेळा म्हणून ही जत्रा ओळखली जाऊ लागली.


महत्त्वाच्या बातम्या:


Buffalo : सर्वात जास्त दूध देणारी म्हैस कोणती? दिवसाला देते 'एवढं' दूध; वाचा सविस्तर