Disney Hotstar : जगात क्रिकेटपेक्षा (Cricket) फुटबॉलचे चाहते जास्त आहेत. फुटबॉल हा जगात सर्वाधिक खेळला जाणारा खेळ आहे. क्रिकेटच्या तुलनेत फुटबॉल खेळाडूंना सर्वाधिक पैसा मिळतो. पण शेअर बाजारातून (Share Market) कमाईचा विचार केला तर फक्त क्रिकेटचे नाव पुढे येते. याचे उदाहरण म्हणजे सध्या भारतात होत असलेला क्रिकेट विश्वचषक. वर्ल्ड कप ब्रॉडकास्टर डिस्ने हॉटस्टर (Disney Hotstar) या कंपनीच्या शेअर्समध्ये वर्ल्ड कपच्या सुरुवातीपासून अंतिम सामना खेळला जाईपर्यंत सुमारे 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या नफ्यात 2.2 लाख कोटी रुपयांची वाढही झाली आहे. 


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज अहमदाबादमध्ये अंतिम सामना होत आहे. अंतिम सामना होण्यापूर्वीच Disney Hotstar कंपनीनं मोठा नफा मिळवला आहे. या विश्वचषकाचे प्रसारण करणाऱ्या डिस्ने हॉटस्टरच्या मूळ कंपनीच्या शेअर्समध्ये विश्वचषक सुरू झाल्यापासून अंतिम सामना खेळले जाईपर्यंत सुमारे 19 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कंपनीच्या मूल्यांकनात 2.2 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 11 महिन्यांपूर्वी नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 मध्ये, FIFA विश्वचषकादरम्यान, डिस्नेच्या हॉटस्टारवरही ते प्रसारित झाले होते. अंतिम सामन्याला विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळाली. त्यानंतरही विश्वचषकादरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण कायम राहिली. कंपनीच्या मूल्यांकनातही घसरण दिसून आली.


क्रिकेट विश्वचषक डिस्नेसाठी ठरला जीवनदायी 


क्रिकेट विश्वचषक हा डिस्नेसाठी जीवनदायी ठरला आहे. या कंपनीला नवसंजीवनी मिळाली आहे. डिस्ने हॉटस्टार कंपनीला क्रिकेट विश्वचषक सामन्यादरम्यान मोठा नफा झाला आहे. 


क्रिकेट 107 देशात तर फुटबॉल 200 हून अधिक देशांमध्ये खेळला जातो


डिस्नेची आकडेवारी पाहण्याआधी फुटबॉल आणि क्रिकेट या जगातील दोन खेळांची आकडेवारी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. जर आपण प्रथम क्रिकेटबद्दल बोललो तर आयसीसीचे 11 पूर्ण सदस्य आहेत, तर 96 देश आयसीसीचे सहयोगी सदस्य आहेत. याचा अर्थ असा की क्रिकेट जगातील फक्त 107 देशांमध्ये खेळला जातो. फुटबॉलचा विचार केला तर जगातील 200 हून अधिक देशांमध्ये फुटबॉल खेळला जातो. जगात 250 दशलक्ष लोक फुटबॉल खेळतात. फुटबॉल खेळणाऱ्या देशांची संख्या क्रिकेटच्या जवळपास दुप्पट आहे.


जगात क्रिकेटप्रेमींची संख्या 250 कोटी 


क्रिडाप्रेमींचा विचार केला तर फुटबॉलप्रेमींची संख्या 350 कोटींहून अधिक आहे. ही संख्या कोणत्याही खेळासाठी सर्वाधिक आहे. तर क्रिकेट दुसऱ्या क्रमांकावर आहे. चाहत्यांच्या संख्येच्या बाबतीत क्रिकेट फुटबॉलपेक्षा 100 कोटी कमी आहे. म्हणजेच संपूर्ण जगात क्रिकेटप्रेमींची संख्या 250 कोटी आहे.


भारत हा क्रिकेटप्रेमींचा बालेकिल्ला 


भारत हा क्रिकेटप्रेमींसाठी हॉट स्पॉट म्हटलं तर कमी होणार नाही. एका अहवालानुसार, भारतासारख्या देशात जिथे क्रिकेटला मोठं स्थान आहे. देशातील 53 कोटींहून अधिक लोकांना क्रिकेट आवडते. दुसऱ्या देशाचे नाव चीन आहे. चिनी लोकांना क्रिकेट खूप आवडते. चीनमध्ये क्रिकेटप्रेमींची संख्या सुमारे 41 कोटी आहे. अमेरिकेत क्रिकेट आवडणाऱ्यांची संख्या 6.3 कोटी आहे. इंडोनेशियामध्ये 5.5 कोटी आणि ब्राझीलमध्ये 3.5 कोटी आहे. असे अनेक देश आहेत जिथे क्रिकेट आवडणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे.


हॉटस्टारने क्रिकेट विश्वचषकादरम्यान केला विक्रम


डिस्ने हॉटस्टार हे भारतात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट विश्वचषकाचे मुख्य प्रसारक आहे. यावेळी डिस्ने हॉटस्टारने एक-दोनदा नव्हे तर तीनदा जागतिक दर्शकांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी भारत-न्यूझीलंड लीग सामन्यांमध्ये पहिल्यांदाच हा विक्रम मोडला गेला. हा सामना जगभरात 4.3 कोटी लोकांनी पाहिला होता. यापूर्वी हा विक्रम अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात फिफा विश्वचषक फायनलचा होता. जो गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात झाला होता. त्यानंतर 5 नोव्हेंबर रोजी कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात शानदार सामना झाला. या सामन्यात विराट कोहलीने कारकिर्दीतील 49 वे शतक झळकावले. हा सामना पाहण्यासाठी जागतिक स्तरावर 4.4 कोटी लोक डिस्ने हॉटस्टारमध्ये सामील झाले होते. उपांत्य फेरीत भारताने न्यूझीलंड विरुद्ध 400 धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात विराट कोहलीनंआपले 50 वे शतक पूर्ण केले. श्रेयस अय्यरने झटपट शतक झळकावले होते. तर मोहम्मद शमीने गोलंदाजी करताना 7 बळी घेतले होते. या सामन्याने सर्व रेकॉर्ड तोडले होते. जगभरातील 5.3 कोटी लोकांनी हा सामना पाहिला होता. आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. त्यामुळं हा विक्रमही मोडण्याची शक्यता आहे. आकडेवारीनुसार, हॉट स्टारवर 6 कोटींहून अधिक लोक हा सामना पाहू शकतात. जो एक नवा विक्रम असेल.


शेअर 19 टक्क्यांनी वाढले  


या विश्वचषकाचा डिस्नेला शेअर बाजाराच्या आघाडीवर खूप फायदा झाला आहे. विश्वचषकाचा पहिला सामना पाच ऑक्टोबरला सुरु झाला होता. 4 ऑक्टोबर रोजी, डिस्नेचे शेअर्स न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये 79.32 डॉलरवर होते. ज्यामध्ये सुमारे 19 टक्के वाढ दिसून आली आहे. अंतिम सामन्यानंतर सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ होऊ शकते.


महत्त्वाच्या बातम्या:


World Cup 2023 Final IND vs AUS : विश्वचषकापासून एक पाऊल दूर, पाहा आतापर्यंतचा शानदार प्रवास