Punjab Election 2022 Date : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यातच आलेल्या ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या प्रादुर्भावामुळे चिंतेत भर पडली आहे. देशावर कोरोनाच्या संकटकाळात उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या निवडणुका पार पडणार आहेत.  उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात पार पडणार आहेत. तर पंजाब गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात  पार पडणार आहेत. 10 मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. पंजाबमध्ये 117 जागांवर एकाच टप्यात मतदान होणार आहे. पंजाबमध्ये  विधानसभाच्या 117 जागा आहेत. पंजाब विधानसभेचा कार्यकाळ  27 मार्च 2022 रोजी संपणार आहे.  


निवडणूक आयोगाने शनिवारी निवडणूकांची घोषणा केली. त्यानुसार, 14 फेब्रुवारी 2022 रोजी पंजाबमध्ये मतदान होणार आहे. 28 जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करु शकता येईल. 29 जानेवारी रोजी अर्जाची पडताळणी होईल. 31 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ असेल. दहा मार्च रोजी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणूकीच्या तारखांसोबतच कोरोना नियमावलीही जारी केली आहे. 


कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने निर्बंध लागू केले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा कालावधी एक तासाने वाढण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. मतदान केंद्रावर असणारे सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले असेल. डिजिटल, व्हर्च्युअल पद्धतीने प्रचार करावा, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.  15 जानेवारीपर्यंत रॅली, सभा, रोड शो, साईकल आणि बाईक रॅलीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली आहे. रात्री आठ पासून सकाळी आठपर्यंत निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच डोअर टू डोअर प्रचारासाठी पाच लोकांना परवानगी देण्यात आली आहे. प्रचारादरम्यान कोरोना नियमांचं पालन करणे बंधनकारक असेल. 


आधीचं बलाबल काय? 
पंजाब          - 117
भाजप          - 3
काँग्रेस          - 77
आप             - 20
अकाली दल       - 15
इतर             - 2


यावेळी हे मुद्दे गाजणार 
शेतकरी आंदोलनातील पंजाब
पंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वाद
कॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामा
अंमली पदार्थांचं सावट
पंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न


संबधित बातम्या :


Election 2022 Dates : पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर, UP मध्ये 7 टप्प्यात मतदान, 10 मार्चला निकाल
Election Guidelines : ओमायक्रॉनचं संकट, त्यात 5 राज्यात निवडणुका, नो रॅली, नो सभा, गाईडलाईन्स नेमक्या काय?
Assembly Election 2022 : पाच राज्यांच्या निवडणुका 2024 च्या दृष्टीनंही महत्त्वाच्या , कुठल्या पक्षासाठी कशी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे?