Punjab Assembly Election 2022 : पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. रॅलीदरम्यान नवज्योत सिंह सिद्धू यांनी अनेक मोठी आश्वासनं महिलांना दिली आहेत. महिलांना  दोन हजार रुपये प्रति महिना देण्यात येतील असं सिद्धू यांनी सांगितलंय. तसंच कॉलेजला जाणाऱ्या मुलींना स्कूटी देण्याचं आश्वासनही सिद्धू यांनी दिलंय.


नवज्योत सिद्धू यांनी रॅलीमध्ये महिलांना दोन हजार रुपये महिना पंजाबमधील महिलांना देण्यात येणार आहे. या अगोदर पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांनी महिलांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानंतर आता कॉंग्रेसने दोन हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. गृहिणींना दोन हजार रुपये देण्यात येणार आहे. 


सिद्धूंनी केलेल्या घोषणा



  • पाचवी पास झालेल्या विद्यार्थिनींना - प्रत्येकी पाच हजार रुपये

  • दहावी पास झालेल्या विद्यार्थिनींना - प्रत्येकी 15,000 रुपये

  • बारावी पास झालेल्या विद्यार्थिनींना - प्रत्येकी 20,000 रुपये

  • महाविद्यालयात जाणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनीला स्कूटी  देण्यात येणार आहे. 

  • परदेशात जाणाऱ्या विद्यार्थिनीला 1 टॅब देण्यात येणार आहे

  • महिलांना घरातील कामे करण्यासाठी विनाव्याज दोन लाख रुपयांचे कर्ज

  • तसेच कॉंग्रेसमधील महिला कार्यकर्त्यांना भेट देण्यात येणार आहे

  • पाच एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या किसान आणि शेतमजूरांना दिवसाला 400 रुपये देण्यात येणार आहे


पंजाब कॉंग्रेस अध्यक्ष पुढे म्हणाले, कॉंग्रेस पक्ष  प्रत्येक गावात महिला कंमाडोची एक बटालीयन तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक गावातील दोन महिला असणार आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ABP C-Voter Survey : पंजाबमध्ये जनतेचा कौल कुणाल? चरणजीत सिंह चन्नी की, सिद्धू? सर्व्हेमध्ये खुलासा