SBI Jobs : तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करायची असेल, तर आजच SBI कडून होणाऱ्या भरतीसाठी अर्ज करा. स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India) स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर्सच्या 19 पदांची भरती करणार आहे, ज्यासाठी एसबीआयने पूर्वी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. इच्छुक उमेदवार 13 जानेवारीपर्यंत या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया 13 जानेवारीला संपणार आहे. उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग मुलाखतीवर आधारित असेल. अंतिम निवडीसाठी गुणवत्ता यादी केवळ मुलाखतीत मिळालेल्या गुणांच्या उतरत्या क्रमाने तयार केली जाईल. जे उमेदवाराने किमान पात्रता गुण प्राप्त करण्याच्या अधीन आहे. जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी समान कट-ऑफ गुण प्राप्त केले, तर अशा उमेदवारांना त्यांच्या वयाच्या उतरत्या क्रमाने गुणवत्तेत स्थान दिले जाईल.


अधिसूचनेत (Notification) असंही सांगण्यात आलं आहे की, कोणच्याही पदासाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी हे निश्चित करावं की, तो/तिने निर्दिष्ट तारखेला या पदासाठी वर नमूद केलेली पात्रता आणि इतर निकष पूर्ण करतो आणि त्याने/तिने दिलेले तपशील सर्व बाबतीत बरोबर आहेत. उमेदवारांना SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंकद्वारे ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. त्यानंतर इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्ड इत्यादी वापरून अर्जाची फी भरावी लागेल. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर, उमेदवारांनी अर्जाची प्रिंटआउट घ्यावी.


रिक्त जागांचा तपशील जाणून घ्या :


सहाय्यक व्यवस्थापक (मार्केटिंग आणि कम्युनिकेशन) : 4 पदं
मुख्य व्यवस्थापक (कंपनी सचिव) : 2 पदं
व्यवस्थापक (SME उत्पादनं) : 6 पदं
उप. व्यवस्थापक (चार्टर्ड अकाउंटंट) : 7 पदं 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI