Bhagwant Mann Cabinet 2022 : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीच्या (AAP) सरकारचं नवं युग सुरु झालंय. 92 जागा जिंकत एकहाती सत्ता प्राप्त केलेल्या भगवंत मान सरकारनं आता सुत्रं हाती घेतली आहेत.  भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आता आपचं सरकार पुढील पाच वर्ष पंजाबमध्ये सत्तेत असणार आहे. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील 10 मंत्र्यांचा नुकताच शपथविधी झाला होता. सोमवारी मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी गृहमंत्रिपद आपल्याकडे ठेवले आहे. पंजाबमधील ड्रग्जवर नियंत्रण मिळवण्याचे मुख्य आव्हान मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडे असणार आहे.


कुणाकडे कोणतं खाते?


Harjot Singh Bains : हरजोत सिंह बैंस यांच्याकडे कायदा आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. हरजोज सिंह बैंस हे आनंदपूर साहिब मतदारसंघातून निवडून आले. ते वकील आहेत, त्यांचं शिक्षण बीए एलएलबीपर्यंत झालं आहे.


Lal Chand Kataruchak : लाल चंद कटारुचक - पठानकोटचे रहिवासी असलेल्या लालचंद यांनी भोज विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे.  त्यांच्याकडे अन्न आणि पुरवठा मंत्रालय सोपवण्यात आले आहे.   


Laljit Singh Bhullar : लालजीत सिंह भुल्लर यांनी पट्टी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदारकी मिळवली आहे. त्यांचं शिक्षण 12 वीपर्यंत झालं आहे. परिवाहन मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


Dr Baljit Kaur : डॉ. बलजीत कौर या मान यांच्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला चेहरा आहेत. त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा, महिला आणि बाल विकास मंत्रालय देण्यात आले आहे.  बलजीत कौर यांनी त्यांनी मलौत विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला.  डॉक्टर बलजीत कौर फरीदकोटचे माजी खासदार साधू सिंह यांच्या कन्या आहेत. त्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत.  


Gurmeet Singh Meet Hayer : गुरमीत सिंह मीत यांना शिक्षणमंत्रालयाची जबाबदारी दिली आहे. त्यांनी हेयर बरनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. गुरमीत सिंह इंजिनिअर आहेत.  


Harpal Singh Cheema : हरपाल सिंह चीमा यांच्याकडे अर्थमंत्रालयाची जाबाबदारी देण्यात आली आहे. हरपाल सिंह चीमा दिडबा  विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवत आमदार झालेत. त्यांनी पंजाब विद्यापीठात विद्यार्थी नेता म्हणूनही कारकीर्द गाजवली आहे. ते दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. 


Harbhajan Singh ETO : हरभजन सिंह ईटीओ  यांनी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. हरभजन सिंह वकील आहेत. त्यांच्याकडे उर्जा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


Kuldeep Singh Dhaliwal : कुलदीप सिंह धालीवाल यांच्यावर ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी अजनाला विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.  त्यांचं शिक्षण दहावीपर्यंत झालं आहे. कुलदीप यांचा परिवार काँग्रेसशी संबंधित होता.  


Brahm Shankar Jimpa : ब्रह्म शंकर शर्मा यांनी होशियारपूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.   ब्रह्मशंकर बारावीपर्यंत शिकले आहेत.  त्यांच्याकडे जल आणि आपत्ती मंत्रालय दिले आहे.


Dr Vijay Singla : डॉ. विजय सिंगला यांच्याकडे आरोग्यमंत्रलयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी मानसा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रसिद्ध गायक सिद्धू मूसेवाला यांचा पराभव केला.